काळाच्या जबड्यात
कुणी भले काहीही म्हणे
पण आहेत सगळे काळाच्या जबड्यात
मोठा नाही त्याहून कुणी
कातीही पैसा असू द्या आयुष्यात
आजपर्यंत कुणीच नाही सुटले
काळाच्या त्या जबड्यातून
कितीही सुंदर कुणी असेना
त्याचे ठरले असते मरण
गर्व अभिमान एका झटक्यात
तो करतो गिळंकृत
बर्याच संधी मिळूनही
माणूस राहतो स्वप्नात
टपून बसलेला असतो काळ
घरात दारात रस्त्यावर
असतो माणूस बेसावध
अचानक झडप मारतो काळ त्याच्यावर
माणसाला माहीत असुनही
लोभाने होतो तो वेडा
काहीही करतो त्यासाठी
पण काळ असतो त्याच्यासाठी खडा
दुसर्याची चिंता माणूस
करत असतो कायम
स्वत:ची चिंता विसरुन
करत असतो फक्त काम
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment