Skip to main content

मन

मनाचे रेंगाळणे
आपले जे मन असते ते असे विचित्र असते की त्याच्याप्रमाणे ते आपल्याला नाचवते .एकदा त्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली की मग तीच गोष्ट त्याला परत परत करावीशी वाटते.मनाला सवय आपणच लावतो .ती सवय एवढी वाढत जाते की मनावरचा ताबा आपला सुटतो .काही जरी केले तरी त्याला ताब्यात ठेवणे फार अवघड असते म्हणून एखाद्याला दारू तंबाखू गुटखा  बिडी सिगारेट यांची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते.असे म्हणतात की 21दिवस एकच गोष्ट आपण केली की त्याची एवढी सवय मनाला लागते की ती गोष्ट परत परत करायला ते आपल्याला भाग पाडते म्हणून चांगल्या सवयी लावून घेतल्या तर ते आपल्या फायद्याचेच आहे पण वाईट सवयी लावल्या तर मग त्यातुन बाहेर पडण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात .काही व्यसनाच्या नशेत एवढे जातात की ती नशा नाही केली तर त्यांचे मन कशातच रमत नाही .त्यांना बेचैन वाटू लागते म्हणून तसे होऊ नये म्हणून ते नशा करतात.पण शेवटी तीच नशा माणसाचा घात करते त्यामुळे जे आपल्यासाठी चांगले नाही त्याची सवय लावूनच न घेतलेली बरी पण आपण बेसावध असतो व कळत नकळत ती सवय लावली जाते व आपण जाळ्यात अडकतो .काहींचा मात्र मनावर फार ताबा असतो नशा घेतली तरी त्याची सवय ते लावून घेत नाही .नाही मिळाले नशेचे पदार्थ तरी त्यांचे मन विचलित होत नाही .काहींना सवय जरी लागली तरी एक क्षण विचार करतात  हे वाईट आहे व त्याचक्षणी ती नशा सोडून देतात पण हे बोटावर मोजण्या इतक्या माणसांच्या बाबतीत खरे आहे.मन हे जसे रसातळाला नेऊन पोहचवते तसेच चांगल्या गोष्टींची सवय लावली तर यशाच्या मानाच्या शिखरावर आपल्याला ते विराजमान करते .बघूया प्रयत्न करू त्याला ताब्यात ठेवण्याचा
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...