भ्रष्टाचार
भ्रष्टाचार हा कळत नकळत
शिकतो माणूस लहापणापासून
कामाच्या मोबदल्यात चाॅकलेट देणार
असे दिले जाते त्याला वचन
काही करायचे असते दुसर्यासाठी
तर मिळतो त्यासाठी मोबदला
असे ठासून सांगितले जाते
त्याच्या स्वार्थी मनाला
छोट्या छोट्या गोष्टी
पुढे मोठ्या होत जातात
माणूस चटावतो फुकटच्या पैशाला
आणि जातो अडकत जाळ्यात
भ्रष्टाचाराचा पैसा दिसायला
असतो खूप छान
संसाराची दिसते प्रगती
एक दिवशी संसाराची जातो वाट लावून
भ्रष्टाचाराच्या पैशापेक्षा घामाचा
पैसा कैकपटीने असतो श्रेष्ठ
सापडला माणूस कायद्याच्या कचाट्यात
जेलमध्ये होतो तो कनिष्ठ
भ्रष्टाचाराने जरी सुटला माणूस
जगाच्या न्यायालयातून
पण देवाचे न्यायालय आहे सर्वाच्च
त्यातून दाखवावे त्याने सुटून
भ्रष्टाचाराने नितिमत्ता खुंटीला
टांगली जाते
समाजाची प्रगती त्यामुळे
पार धुळीला मिळते
भ्रष्टाचारामुळे पैशाची नसते
माणसाला त्याची किंमत
कसाही तो खर्च केला जातो
कारण फुकटचा येत असतो खिशात
भ्रष्टाचाराचा पैसा दान दिल्याने
नाही मिळत पुण्य कोणते
घामाची एक दमडीही
त्याच्यापुढे श्रेष्ठ ठरते
शिक्षण घेतलेला माणूसच
करतो वरच्या दर्जाचा भ्रष्टाचार
असतात त्याच्याकडे युक्त्या
पोखरतो आपले खाते आरपार
एक दिवस द्यावा लागेल
आपल्याला भ्रष्टाचाराचे उत्तर
तेव्हा कुणीच वाचवू शकणार नाही
म्हणून जावे त्याच्यापासून खूप दूर
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment