छोट्या गोष्टी
प्रत्येक घटनेमागे एक छोटीशीच गोष्ट कारणीभूत ठरते .त्या छोट्या गोष्टीला आपण काडीचीही किंमत देत नाही पण त्याचा परिणाम बघितल्यावर त्या गोष्टीचे गांभिर्य लक्षात येते .उदा. एखादे धरण जेव्हा फुटते तेव्हा त्याआधी धरणाचा बांध हळूहळू छोटाशा कुठेतरी फुटतो व वेळीच लक्ष न दिल्याने मोठ्या पुरात त्याचे रुपांतर होते तसेच दोन व्यक्तीमध्ये एखाद्या छोट्याशा कडव्या शब्दांने भांडणाला सुरवात होते वेळीच माफी मागितली तर तो विषय संपतो पण माफी मागणे म्हणजे कमीपणा असे समजून शब्दाला शब्द वाढत जातो व त्याचेरुपांतर हाणामारीत काहीवेळा खूनामध्ये होते मग जेलमध्ये स्वत:तर जातोच पण कुटूंबाचेही आयुष्य बरबाद होते .सुरवात छोट्याशा शब्दांने झाली होती.घरामध्ये क्षुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद होतो एकाने माफी मागून वाद संपवला पाहिजे पण वादाचे रुपांतरकाहीवेळा भयंकर होते व कुणाचा तरी जीव जातो पूर्ण कुटूंबावर दु:ख कोसळते .एखाद्या शब्दांने कैक वर्षाचे संबंध संपुष्टात येतात .पावसाची सुरवात काही थेंबाने सुरु होतेव वेळीच थांबला नाही तर गावोच्या गावं वाहून जातात म्हणून छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होता कामा नये .मोठ्या गोष्टी घडायला त्या कारणीभूत ठरतात त्यामुळे वेळिच त्या थांबवल्या पाहिजे म्हणजे पुढील अनर्थ टळतो.चांगल्या गोष्टीसाठी मात्र छोट्या गोष्टी थांबायला नको .बाराखडी पासून सुरवात करून शेवटी पीएडीधारक माणूस बनतो .देशाचे नेतृत्व ही तो करतो. बघा पटतं का
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment