पाहूणा
आपल्या घरी पाहूणा येणार असे समजल्यावर आपण घर अगदी स्वच्छ करतो गादीवरच्या चादरी बदलतो .अस्ताव्यस्थ पडलेले सामान आपण व्यवस्थित लावतो .कुठे पसारा नाही याची खात्री करतो तसेच त्याला खाण्या पिण्याला काय लागेल याचे नियोजन करतो जेणेकरून तो खुश झाला पाहिजे असा आपला हेतू असतो .जर थोडे दिवस आलेल्या पाहूण्याचे आपण एवढी काळजी घेतो तर मग आपल्याकडे असलेल्या खर्या पाहूण्याकडे आपण दुर्लक्ष करतो .आता खरा पाहूणा कोण हे आता सांगतो .परमेश्वर आपण जन्माला आल्याबरोबरच आपल्या ह्रदयात पाहूणा म्हणून आला आहे त्याला पाहूणा उपमा दिली कारण पाहूणा कधी ना कधी घर सोडून जातोच .हा पाहूणा आपल्या शरीरात आहे हेच आपल्याला पटत नाही .हा पाहूणा जगाचा मालक आहे सर्वात शक्तीमान आहे व त्याच्या वास्तव्यानेच आपले सर्व इंद्रिय कार्यरत आहेत कारण आपल्या इंद्रियाचे बटनं त्याच्या हातात आहेत .तो ह्रदयाच्या एका छानशा खोलीत आहे व तेथूनच आपल्या इंद्रियाचे बटनं सुरु किंवा बंद करतो उगीचच खेळ म्हणून तो बटनाशी खेळत नाही तर तसे करायला आपणच प्रवृत्त करत असतो .त्याला दु:ख पोहोचेल असे आपण काम करत असतो .तो आत मध्ये आहे हे जाणूनही आपण सिगारेट दारू गांजा गुटखा बिडी असे नशीले पदार्थ घेतो तसेच द्वेष मत्सर राग यांना स्थान देतो .शरीरात अशांती पसरवतो व ते त्याला आवडत नाही पण आपण सुरुच ठेवतो मग नाईलाजाने एका एका इंद्रियाचे बटन तो बंद करायला सुरवात करतो आणि बटनं बंद झाले की ते इंद्रिय बंद पडते व आपण म्हणतो काहीतरी आजार झाला .बर्याच वेळेला तो माफ करतो पण त्याला जेव्हा असह्य होते तेव्हा तो ते बटनं बंद करतो तरीही माणूस सुधारला नाही तर मग आपल्या शरीरातून निघून जाण्याचे ठरवतो व मग एक दिवस ह्रदयाचे म्हणजे त्याच्या खोलीचे बटन बंद करतो व त्या खोलीच्या बाहेर पडतो आणि पुन्हा कधीच परत येत नाही व त्याला आपण मृत्यू म्हणतो तो गेल्यावर आपण काहीच करू शकत नाही कोणतीही ताकद हालचाल होत नाही मग शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतेमाणसाच्या जन्मामध्ये त्याचे दर्शन घेणे आत बाहेर शक्य आहे असे संत सांगतात पण इतर जन्मांमध्ये तेशक्य नाही म्हणून माणसाच्या जन्मातच तो आत आपल्याला दिसला की जन्म मरणाचा फेरा चुकला असे म्हणतात.काही माणसे तो आत आहे असे समजून त्याला प्रसन्न करण्यासाठी चांगले कामं करतात चांगले बोलतात समाजसेवा करतात .नशिले पदार्थाचा त्याग करतात व चांगले पदार्थांचे सेवन करतात भजन किर्तन करतात .निसर्गाच्या सानिध्यात जातात. तो जसा आत आहे तसाच तो इतरांमध्ये दिसायला लागतो तो खुश आहे हे तो त्याच्या परिवाराला कळवतो व मग त्याची भेट घेण्यासाठी लक्ष्मी सरस्वती कुबेर शांती अशा अनेक प्रकारचे दैवी शक्ती हजर होतात . संताना तर जळीस्थळी पाषाणी मध्ये त्याचे दर्शन झाले अशा लोकांच्या ह्रययातून जातांना त्यांनाही आपले सारखे बनवतो व आपल्यात विलीन करून घेतो व त्यांना त्याचेच रुप मिळते व त्याला मोक्ष असे म्हणतात म्हणून आलेला पाहूणा दुखावला जाणार नाही याची आपण काळजी घेऊ या .संत तुकारामांच्या भाषेत देव पाहावयासी गेलो तो देवच होऊन ठेलो .चला प्रयत्न करू या.
प्रा. दगाजी देवरे
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment