मित्रा तुम्हांला देतो आज
मनापासून निवृतीच्या शुभेच्छा
असंच आनंदु जीवन जावो
अशी करतो परमेश्वराकडे इच्छा
तुमच्याकडे बघून वाटत नाही
तुम्ही खरंच रिटायर होणार
दिसतात तुम्ही चाळिशीतले
निवृती मनाला नाही पटणार
कपड्यांची निवड ही आहे
तुमची फार चांगली
रोज छान छान कपड्यात
तुमची पर्सणॅलिटी खुलली
कायम हसरा चेहरा असणे
हा आहे तुमचा चांगला गुण
मित्रही खूप जोडले
त्यामुळे आनंदी राहिले तुमचे मन
शिकवण्याची हातोटी आहे
तुमची न्यारी
विद्यार्थी रमून जायचे तासाला
तुमची बघून अभ्यांसाची तयारी
non teaching मध्येही
आहेत तुमचे बरेच मित्र
सगळ्यांशी खुशाली विचारून
मदतीला धावायचे मात्र
बाबासाहेबांचे विचार तुम्ही
आपल्या जीवनात रूजवले
समाजामध्येही केला प्रचार
त्यासाठी आपले जीवन झिजवले
अनेक समाजोपयोगी उपक्रमात
असतो तुमचा सहभाग
आहे त्याची तुम्हांला आवड
मग कितीही झाली असेल दगदग
स्वत: अपार कष्ट करून
मुलाला अमेरिकेला पाठवले
त्याच्या जीवनातल्या स्वप्नासाठी
सर्वकाही तुम्ही पणाला लावले
कुणी कितीही टिका केली
तरी शांत चित्ताने त्याला उत्तर दिले
झाले असतील बर्याच जणांशी वाद
मौन कधीच नाही धरले
तुमची बसायची खुर्ची होती
काॅमनरूममध्ये फक्त एकच
तिथेच तुम्हांला शांत वाटायचे
कारण आम्हांला कळले पाहिजेच
कधी कधी व्हायचे
काॅलेजची कामं करायला उशिर
ते कामं छान व्हावे
हे असायचं तुमचे कायम उत्तर
माझ्या शब्दाने काहीवेळा
तुम्ही दुखावले गेले
पण तुम्ही निभावली मैत्री
म्हणून तुमचे आभार मानावेसे वाटले
आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये
आहेत तुम्ही प्रिय
येतात तुम्हांला भेटायला
सांगतात तुम्ही त्यांच्या समस्येवर उपाय
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment