आज मी ब्रम्हं पाहिले
हिरवा रंग निसर्गात
पुरेपुर देवाने भरला
पाहून मी थक्क झालो
त्याच्यात मी ब्रम्हं पाहिला
सागरात खेळते पाणी
लाटांरूपी शालू नेसला
सागरात मस्त डोलतांना
मी ब्रम्हं तो पाहिला
आकाश पसरले दुरवर
निळा रंग हा त्याने भरला
ढगांचे विविध रूपात
मी ब्रम्हं तो पाहिला
पावसाच्या सरीवर सरीबरोबर
ढगांचा गडगडाट ऐकला
वीजांच्या त्या लखलखाटात
मी ब्रम्ह तो पाहिला
पक्षांचा मधूर मधूर आवाज
पहाटेच्या प्रहरी आला
कोकीळच्या गोड गाण्यात
मी ब्रम्हं तो पाहिला
लहान लहान बालके
घालतो तो जन्माला
त्यांच्या निरागस हसण्यात
मी ब्रम्हं तो पाहिला
आकाशात ग्रह तार्यांचा
सडा हा पडला
शीतल चांदण्या रात्री
मी ब्रम्हं तो पाहिला
गाय वासरात प्रेम बघून
मायेचा ओलावा आठवला
गायीच्या त्या डोळ्यात
मी ब्रम्हं तो पाहिला
गोरगरीबांची सेवा करण्यात
कुणीतरी त्यात रमला
त्या व्यक्तीच्या रूपात
मी ब्रम्हं तो पाहिला
आईवडिलांच्या पुण्यांईने
आजपर्यंत मी वाढला
त्यांच्या निस्वार्थ ममतेत
मी ब्रम्हं तो पाहिला
गुरूजनांच्या ज्ञानाने
प्रगतीचा शिखर गाठला
त्यांच्या त्या व्यक्तीमत्वात
मी ब्रम्ह तो पाहिला
मित्रमंडळीने माझ्या जीवनी
आनंद हा पेरला
त्यांच्या त्या रुपात
मी ब्रम्ह तो पाहिला
शांत प्रहरी डोळे मिटून
ह्रदयात मी शोधला
मधूर बासरी वाजत
मी ब्रम्हं तो पाहिला
वारकरी जमले किर्तनी
नामाचा महिमा कळला
त्या गोड नामात
मी ब्रम्हं तो पाहिला
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment