बदल
दिवस बदलतात महिने बदलतात
वर्ष ही शेवटी बदलते
सवयी कायम ठेवून
शरीरही आपले बदलते
तोच राग तोच द्वेष
मनाच्या असतो गाभार्यात
त्यांची तीव्रता कमी न करता
रोजच जातो वाढत
तेच बोलणे तेच न हसणे
समोरच्याला बघून मान तिरपी करणे
तेच काम तसेच चालणे
अपेक्षा धरावी दुसर्याने बदलणे
केस पिकतात दात पडतात
शरीर शेवटी थकते
सवय नेहमीची आपली
दुसर्याला दोषी ठरवते
याला ओळखले त्याला ओळखले
स्वत:ला मात्र सोडून
राग असतो कायम नाकावर
निमित्त पाहिजे फक्त समोरून
बालपण गेले डोळ्यासमोरून
तारूण्यही आले सरत
म्हातारपणाचे दिसायला लागले लक्षणे
काहीच बदल नाही वागण्यात
रस्त्यावरचे खाणे काहीतरी पिणे
पोटाचा कोणताही विचार नसणे
जायची यायची नसते कोणती वेळ
कायम शिस्तीत न वागणे
माणसा माणसा जागा हो
आयुष्य चालले संपून
बदल करावा आपल्यात
स्वत:ला पुरेपूर ओळखून
आज नको उद्या करू बदल
करता करता दिवस चालले भराभर
भिंतीवरचे कॅलेंडर बदलून
माणूस बनायचे राहिले दूर
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment