तीन अवस्था
सकाळ म्हणजे जणू
एक प्रकारचे असते बालपण
शुद्ध विचार शुद्ध आचार
उत्साही राहते मन
सकाळच्या वेळी मनात येते
चिंतन करावे देवाचे
बालपणीही आवडतात देवाच्या गोष्टी
तेच क्षण असतात संस्कार करण्याचे
दुपार समजावी जणू
तारूण्याचा काळ
मन नसते कधी जागेवर
धावत असते न बघता वेळ
दुपारी अनेक विचार
घालतात थैमान
तारुण्यातही अनेक विचारांनी
मन होते बेभान
तिसर्या प्रहरी लागते
चाहूल म्हातारपणाची
केस पांढरे चेहर्यावर सुरकुत्या
चिंता वाढते आरोग्याची
तिसर्या प्रहरी कामात येते
थोडीशी शितलता
तसचं होते त्या वयात
शरीरात जाणवते कमतरता
संध्याकाळ असतो जणू
म्हातारपणाचा काळ
सांगता येत नाही जीवनाचे
कधी काय होईल
संध्याकाळी विचार असतो
दिवसभर काय केल्याचा
म्हातारपणीही असतोच तोच विचार
तरूणपणी काय काम केल्याचा
गाढ झोप ज्याची लागते रात्री
लक्षण आहे दिवसभर चांगले काम केल्याचे
मरणही ज्याला येते शांत
जीवनभर चांगले कर्म ज्याचे
असावा सर्वकाळी उत्साह
सदा आपल्या जवळी
त्याने होतील चांगले कामं
समाजाचे होईल त्यामुळे भले वेळोवेळी
प्रा.दगा देवरे
Comments
Post a Comment