गोंधळ
माणसाच्या मनात तीन मार्गानी गोंधळ घुसतो व त्या गोंधळांमुळेच माणूस मनशांती हरवून बसतो.पहिला मार्ग गोंधळ शिरण्याचा म्हणजे आपले कान.कानाद्वारे आपण ऐकतो .विविध प्रकारचे आवाज कानाद्वारे आपल्यात घुसतात मग चांगले आवाज मनाला आनंद देतात तर काही आवाज मनाला क्लेश देतात. आपली इच्छा नसतांनाही काही आवाज कानावर पडतात व मग त्या आवाजाने मनात गोंधळ सुरु होतो .दुसरा मार्ग गोंधळ घुसण्याचा म्हणजे आपले तोंड.गरज नसतांना काहीजण फालतूक बडबड करत असतात .छोट्या कारणांनी शिवीगाळ करतात व नको ते शब्द तोंडानी उच्चारले जातात .त्या शब्दांचा दुसर्याला त्रास होतोच पण स्वत:च्या मनालाही खूप होतो व मनात गोंधळाची स्थिती निर्माण होते .तिसरा गोंधळ म्हणजे न ऐकताही व न बोलताही आपल्या मनात गोंधळ चालू असतो .आपण आपल्याशी बोलत असतो विचाराने .हे असे झाले ते तसे झाले .हा असा का बोलला मग मी ही उत्तर देईन. त्याचा बदला घेईन असे नाना प्रकारे आपण विचार करुन स्वत:शीच बोलत असतो व अशा बोलण्याने मनात गोंधळ निर्माण होतो .जेव्हा हे तिनही गोंधळ बंद होतील तेव्हाच मन एकाग्र होईल व जेव्हा हे तिनही आवाज ऐकण्याचे थांबेल तेव्हा आत असणारे आवाज ऐकू यायला लागतील. हे आवाज थांबविण्यासाठी बाजारात ear plug मिळतात त्या द्भारे कानात टाकल्यावर बाहेरील आवाज बंद होतात .तोंड बंद ठेवल्याने तो गोंधळ बंद होतो व श्वास दहा पासून झिरो पर्यत मनातल्या मनात मोजल्यास विचाररूपी गोंधळ बंद होतो व हे रोज करत गेल्यास मन विचारशून्य होते मग खरी प्रकिया सुरू होते. पहिला आवाज श्वासाचा ऐकू येईल नंतर मग ह्दयाचे ठोके ऐकू येतील मग त्यानंतर एकदम पातळ आवाज ऐकू यायला लागतील व नंतर असा आवाज ज्याला ज्ञानेश्वरांनी अनाहत नाद असे म्हटले आहे तो ऐकू येईल. असे करता करता शेवटी ओमचा ध्वनी ऐकू येईल व त्यानंतर आपण कोण आहोत हे कळेल .हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा वरील तिनही प्रकारचे आवाज बंद होतील व यालाच तर meditation म्हणतात . जेव्हा हे शक्य होईल तेव्हा माणसामध्ये आमुलाग्र बदल होईल एखाद्याचे वाईट व्हावे असा कधीच मनात विचार येणार नाही तसेच कितीही बाहेर वाईट घटना घडली तरी त्याचे दु:ख जाणवणार नाही कारण जे मिळवायचे ते त्याला आत मिळून गेलेले असते व त्याच्याशिवाय जीवनात काही मिळवायचेच नसते . काल माझ्या वाचनात आले . प्रयोग करू या .बघूया खरंच असे आतील आवाज येतात की नाही
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment