मांडिला खेळ
का रे मांडिला हा संसाराचा खेळ
सुख आणि दु:ख त्यात भरून
धावतात लोक सदा काळी
नाही मिळत कुठे समाधान
श्रीमंत गरीबात मुले येतात जन्माला
कोणते पाप पुण्य असते त्यांच्या गाठीशी
कुणालाच नाही उमगले हे कोडे
तू असतो का रे सगळ्यांच्या पाठीशी
कुणाला किती आयुष्य
हे फक्त असते तुलाच माहीत
आयुष्याची दोरी आहे रे तुझ्या हाती
माणूस जगतो मात्र अज्ञानात
गरीब श्रीमंत थोर लहान
असा नाही करत तू भेदाभेद
ज्याचे भरले पारडे जीवनी
त्याला उचलतो अलगद
गरीब होतो श्रीमंत
श्रीमंत होतो कधी गरीब
सत्य तूचं जाणतो
नक्की काय आहे ती बाब
तुला निंदा अथवा वंदा
करतो सगळ्यांना एकच न्याय
कर्मा प्रमाणे देतो फळ
नाही करत कुणावर अन्याय
हा खेळ खेळता खेळता
दमला असशील रे तू देवा
कशाला तरी मांडला हा खेळ
शेवटी आहे हा सारा देखावा
कारण तरी सांग मला
का रचला हा संसार
शेवटी बाकी सगळ्यांची शून्य
कुणी कितीही असेल शेर
उपजे ते नासे ,नासे ते उपजे
हा केला तू नियम तयार
स्वत: अविनाशी राहून
लोकांच्या माथी मारला हा भवसागर
कितीही यंत्राचा शोध लावून
माणसांच्या बुध्दीने तू नाही गवसला
संताना आहे माहीत
तू भावाचा रे भूकेला
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment