पीठ आणि शरीर
आपल्या घरी बाजरीचे गव्हाचे तांदळाचे पीठ असते .जेव्हा आपण भाकरी करतो तेव्हा जर पीठ व्यवस्थित मळले गेले नाही तर भाकरी व्यवस्थित होत नाही .बर्याच वेळा भाकरी काठांना फाटतात किंवा फुगत नाहीत त्याचे कारण म्हणजे पीठाची योग्य मळणी झालेली नसते .जास्त कडक नाही की एकदम मऊ नाही अशा पद्धतीने पीठ मळले की मग त्या भाकरीला एकदम गोल आकार देता येतो ते ही जास्त कष्ट न घेता किंवा चपातीही गोल होतात काठ न फाटता म्हणजेच पीठाला लवचिकपणा आला की मग हवा तसा आकार देता येतो
त्याचप्रमाणे आपले शरीरही लवचिक असले की मग कोणताही त्रास होत नाही .काहींना बसता येत नाही मांडी घालून कारण पाठ दुखते कंबर दुखते गुडघे दुखतात .आपल्या शरीरात अनेक सांधे आहेत .उठल्यावर प्रथम सांध्याचा व्यायाम करावा .सांध्यांमध्ये लवचिकपणा यायला हवा मग बोटाचे असतील पायाचे असतील हाताचे असतील कमरेचे असतील मानेचे असतील .असे सगळे सांधे व्यायाम योगाने मोकळे करावे म्हणजे त्यात लवचिकपणा येईल म्हणजे बसतांना उठतांना त्रास होणार नाही .अनेक आसनांचा सराव करून ते आसने यायला हवेत .बर्याच जणांना पदमासनात वज्रासनात बसता येत नाही मग ते सुखासन पसंत करतात .काहींना सुखासनात बसता येत नाही मग ते खुर्चीवर बसतात.जेवण करतांना कधीही जमिनीवर मांडी घालून जेवण करावे .त्यामुळे पचन चांगले होते.डायनिंग टेबलवर कधीही जेवण करू नये .पण बर्याच जणांना मांडी घालून जेवण करता येत नाही कारण शरीराचा प्रत्येक भाग कडक झाला आहे त्यामुळे ते भाग वाकत नाही पण रोज आपण सराव केला तर नक्कीच आपल्या शरीरात बदल घडून येतो .स्वभावात नम्रपणा व शरीरात लवचिकपणा असेल तर माणसाला या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही पण माणूस या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो .पैसे कमवायचे आहेत ना मग शरीर लवचिक असेल तर मग कोणतीही व्याधी डोकं वर काढणार नाही .शिर सलामत तर पगडी हजार असे म्हटले जाते.आपले शरीर निरोगी असेल तर मग काहीही साध्य करता येते .यासाठी निरंतर योगा प्राणायाम व्यायाम हे केलेच पाहिजे व सकारात्मक विचारांची जोडही आवश्यक आहे .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment