सुंदरता
जी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून सुंदर वाटते की सुंदर आहे म्हणून आवडते? बर्याच गोष्टी इतरांच्या दृष्टीने सुंदर असतात पण आपल्या दृष्टीने त्या नसतात .याउलट आपल्याला एखादी गोष्ट सुंदर वाटते पण इतरांना नाही वाटत.मग सुंदरता ही आपल्या दृष्टीवर अवलंबून असते .आपल्या आवडीवर अवलंबून असते.एखाद्याला भजनाची आवड असेल व एखादा अभंग भावरुपात बाबा म्हणत असतील तर त्या देवाच्या भक्तीने आपले डोळे भरून येतात व तोच अभंग आजच्या एखाद्या तरूणाला बोर वाटतो .त्याचे डोकं दुखायला लागते पण एखाद्या सिनेमाचे गाणे लागले तर तो मंत्रमुग्ध होतो व डोलू लागतो .आपल्याला त्याचे डोलणे व ते गाणे बोर वाटायला लागते .संताप होतो आपला म्हणून जी गोष्ट सुंदर नाही पण आपल्याला सुंदर दिसते व जी गोष्ट सुंदर आहे पण आपल्याला ती वाटत नाही या दोन्ही गोष्टी निरर्थक असतात .जी मुळातच सुंदर आहे व आपल्यालाही ती सुंदर दिसते असा मिलाप जेव्हा होतो त्याचे काय वर्णन करावे?काही गोष्टी बाह्ररुपाने सुंदर दिसतात पण आतील गुणांनी ते कुरूप असतात व माणूस वरच्या रंगाला भुलतो व हळूहळू त्याचे लक्ष वरच्या रंगावरुन उडते व आतील गुणांकडे जाते मग त्याच्या लक्षात येते की जी गोष्ट त्याला सुंदर वाटत होती ती तर फार कुरूप आहे व पश्चाताप करू लागतो .काहीवेळा एखादी व्यक्ती दिसायला चांगली नसते पण तिच्यातले जे गुण असतात ते अप्रतिम असतात व त्या गुणांमुळे आधी कुरूप दिसणारी व्यक्ती सुंदर वाटायला लागते म्हणून सुंदरता ही बाह्ररूपाने असली की टिकत नाही पण गुणांची सुंदरता मरेपर्यंत तशीच राहते.काही व्यक्ती भाग्यवान असतात की ते बाह्ररुपाने सुंदर असतात व आतील गुणांनीही तेवढेच सुंदर असतात अशा व्यक्ती बोटावर मोजण्या इतक्या असतात .आता संसारातील आतील सुंदरता असो की बाहेरील सुंदरता काळाच्या ओघात लय पावतात व ती सुंदरता बघून प्रपंच चांगला चालतो पण आत्मदर्शन ज्याला म्हणतात ते व्यक्तीवरील सुंदरतेने नाही होत कारण ती सुंदरता आपण फक्त एकाच व्यक्तीमध्ये बघत असतो पण संताच्या दृष्टीने देव हा रुपाचा व गुणांचा धनी आहे व त्याची आवड माणसाला लागली की त्याची सुंदरता पूर्ण निसर्गात दिसायला लागते .कधी पावसाच्या रुपात, कधी हिरवीगार झाडांच्या रुपात ,कधी चंद्र सूर्य तारे यांच्या रुपात, कधी सगळ्या प्राण्यांमध्ये त्याचे अस्तित्व दिसू लागते .त्याची सुंदरता ही सगळीकडे पसरली आहे असे संताना दिसू लागते व शेवटी तो आपल्यातही आहे म्हणून आपण सगळ्यात सुंदर आहोत असे वाटायला लागते म्हणून जी सुंदरता कधी लयाला जाणार नाही व सगळिकडे तिचे अस्तित्व जाणवेल अशा सुंदरतेची मनाला गोडी लागली तर काय बहार येईल .ट्रेनमध्ये बसलो तरी तिच्या आवाजातून ओमचा आवाज येतो असे वाटायला लागेल .कोकीळचा जेव्हा आवाज येईल तेव्हा तो परमेश्वर गातो आहे असे वाटायला लागेल .कुणी मदत केली आपल्याला तर तोच त्या रुपात आला असे वाटेल म्हणजे कोणतीही गोष्ट घडल्यावर त्याला कारण तोच असे वाटायला लागेल अशावेळी एक भक्कम आधार आपल्याला आहे असे वाटेल त्यामुळे माणूस बिनधास्त जगेल व शांतीचा अनुभव घेईल म्हणून अशी जी सुंदरता आहे तिची आवड निर्माण व्हायला हवी व ज्याला ती आवड आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत तसेच भाग्यवान समजावा.
प्रा. दगा देवरे
7738601925
Comments
Post a Comment