कानावरचा द्वारपाल
आपल्या शरीराचा विचार केला तर असे दिसून येईल की डोळे बर्याच वेळा आपण बंद करतो .नाक असे अवयव आहे की घाण वास त्याला सहन होत नाही लगेच शिंक येते म्हणजे वाईट गोष्टी ते स्विकारत नाही .आपोआप वाईट न स्विकारणे ही त्याची सवयच आहे आपण काहीही कष्ट न करता ती क्रिया घडत असते पण कान असे इंद्रिय आहे की ते चोवीस तास उघडे असते .आपण डोळे बंद केलेत तरी कानाचे कार्य चालूच असते त्यामुळे हा हलक्या कानाचा असे म्हटले जाते .कानाने जे ऐकले ते खरेचं असते असे नाही पण ज्या भानगडी होतात त्या ह्या कानामुळेच .नको ते ऐकायचे काम कान करत असतात.चांगली गोष्ट कान उघडे असले तरी त्याच्यामध्ये शिरत नाही पण वाईट गोष्ट ऐकण्यासाठी ते आसूरलेले असतात .कुणाची निंदा अवेहलना या गोष्टी त्याला फार आवडतात व त्या गोष्टी ऐकुन तो शरीरात सोडतो त्यामुळे मनामध्ये संशय निर्माण होतो व नको त्या गोष्टी घडतात.काय ऐकावे व काय ऐकु नये ही त्याला सवय लावली तर आपला फायदा आहे. काही लोकांना चांगले भजन चांगली गाणी चांगल्या कथा कादंबर्या चांगल्या गोष्टी ऐकायला फार आवडतात त्यामुळे एक सकारात्मक उर्जा शरीरात तयार होते पण ज्यांना दुसर्याची निंदा तसेच वाईट गोष्टी ऐकणे घाणेरडे विनोद घाणेरड्या कथा गोष्टी ऐकल्या की शरीरात नकारात्मक उर्जा तयार होते व माणूस जशी उर्जा तयार झाली तसा वागू लागतो म्हणून कानाचे द्वार हवे तेव्हा बंद करता आले पाहिजे व हवे तेव्हा उघडता आले पाहिजे तसेच जरी कायम उघडे ठेवले तरी ऐकुन कोणती गोष्ट सोडून द्यावी व कोणती आचरणात आणावी हे ज्याने त्याने ठरवावे म्हणून कान हे इंद्रिय दोन्ही बाजूंनी शरीरावर आहे व हेच आपल्या विकासाला व अविकासाला कारणीभूत ठरते.एखादा आपल्या कानात कुजबूज करून शब्दरुपी विष असे कालवतो की चांगली गोष्ट घडता घडता वाईट गोष्ट आपल्या हातून घडून जाते म्हणून द्वारपाल ह्या कानावर आपला नेमला पाहिजे जेणेकरून चांगले आत सोडील व वाईटाला मज्जाव करील. रामायण घडले कारण मंथरेने कैकयीच्या कानात नको ती कुजबूज केली .महाभारत घडले कारण धृतराष्ट आंधळा होता पण नको ते कानाने ऐकून पांडवांना वाईट वागणूक दिली म्हणून कानाने माणूस श्रीमंत असला पाहिजे .ज्यामुळे सकारात्मक विचार निर्माण होतील असेच ऐकावे .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment