प्रवास
आपला जन्म होण्याआधीच
सुरु होतो प्रवास
इच्छा नसतांनाही आपली
होतो मात्र त्याचा त्रास
सतत करत असतो प्रवास
काहीतरी साध्य करण्यासाठी
ते मिळेलच आपल्याला
याची नसते कोणती गॅरंटी
काही प्रवास ठरवून
पण क्षणात तो बदलतो
कधी कुठे करावा लागेल प्रवास
हे येणारा काळच ठरवतो
प्रवास म्हणजे फिरणे नसून
काहीतरी त्याच्यातून शिकावे
नसावा तो वेळ काढूपणा
चांगले घेऊन तसे वागावे
जन्म मरणाचा प्रवास
लागला आहे सगळ्यांच्या पाठी
त्यातून कुणीच नाही सुटत
हे आहे प्रत्येकाच्या ओठी
प्रवासासाठी हवी चांगली सोबत
ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी
भरकटवणारे अनेक भेटतात
आपली वाट चुकवण्यासाठी
जीवनाचा प्रवास होतो चांगला
आयुष्याच्या चांगल्या जोडीदाराबरोबर
काहींचा प्रवास थांबवतो
अयोग्य असा जोडीदार
संताच्या बरोबर होतो
प्रवास हा आनंदाचा
देवाच्या भजनात लागतो
थांग हा मनाचा
एकांतात बसूनही करता येतो
आपल्या मनासारखा प्रवास
आतून मनाला पळवावे लागते
त्यासाठी एकाग्रता लागते खास
कधी प्रवास थांबेल
याची नसते कोणती शाश्वती
त्याच्याआधीच करावा प्रवास
जन्म मरणाची थांबवावी आपत्ती
काहींना नसते दिशा
कुठे प्रवास करण्यासाठी
संपूर्ण आयुष्य वाया घालवतात
विनाकारण फिरण्यासाठी
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment