राग का येतो
प्रत्येक माणसाला राग येतोच मग कुणाचा राग कमी तर कुणाचा राग जास्त असतो.काहींना रागाच्या भरात आपण काय करतो याचे भान नसते त्यामुळे रागाच्या भरात समोरच्याचे आपण किती नुकसान करतो व स्वत:चे किती नुकसान होते याचे भान नसते .मन सैरभैर झालेले असते त्यामुळे बुद्धी काही तरी विचित्र निर्णय घेते त्यामुळे माणसाचे प्रचंड नुकसान होते व घरात व मनात शांती नांदत नाही .बर्याच वेळा आपल्याला जो राग येतो त्याचे खापर आपण दुसर्यांवर फोडतो .अमुकने तमुक केले म्हणून मला राग आला म्हणजेच आपला रिमोट आपण दुसर्याच्या हातात देऊन मोकळे होतो .दुसरा हवा तेव्हा बटन दाबेल व आपण रागात थैमान घालत बसू मग आपल्यात व निर्जीव टि व्हीत काय फरक आहे ? आता हा राग का उत्पन्न होतो
प्रत्येक माणसाला वाटते आपल्याला हवे ते मिळाले पाहिजे व मी जे सांगेल ते समोरच्याने ऐकले पाहिजे .मला अपशब्द कुणी बोलता कामा नये.आपल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही की मग राग येतो .आपल्या मनासारखे घडले नाही किंवा आपल्या मनासारखं दुसरा वागत नाही तर राग हा येतो .माझे मत चुकीचे जरी असले तरी माझेच ऐकले पाहिजे .मला कुणी शहाणपणा शिकवू नये .जगातले जे ज्ञान आहे ते फक्त मलाच आहे असा जेव्हा दृष्टिकोन तयार होतो तेव्हा राग हा कधी टोकाला जाईल हे सांगता येत नाही .आपण फक्त स्वार्थाचा विचार करतो .काहीही करून आपलाच फायदा झाला पाहिजे व मी म्हणेल तसे झाले पाहिजे असा दृष्टीकोन जेव्हा तयार होतो तेव्हा राग येतो पण जेव्हा दुसर्याच्या मनासारखं आपणही वागले पाहिजे .दुसर्याच्या अपेक्षांची पूर्ती आपल्याकडून झाली पाहिजे .दुसर्याच्या मनासारखे आपणही वागले पाहिजे.माझे नुकसान झाले पण समोरच्याचा फायदा झाला असा विचार मनात आला पाहिजे.प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडेलच असे नाही असा विचार मनात आला पाहिजे .आपल्यामुळे समोरचा माणूस खुश झाला पाहिजे .असे जेव्हा आपल्या मनात विचार येतील तेव्हा राग आपल्याला येणार नाही .दुसर्याकडुन अपेक्षा न करता आपल्याकडून दुसर्याच्या अपेक्षांची पूर्ती झाली पाहिजे असे ज्यावेळी होईल त्यावेळी आपल्या मनात रागाला जागाच उरणार नाही व मनात शांती कायम वास्तव्य करील यात काडीमात्र शंका नाही .ज्याने राग मारला त्याने वाघ मारला असे म्हणतात. रागाने होणारे मनातील घरातील नातेसंबंधातील नुकसान टाळायचे असेल तर वरील विचार अंगी बाळगावे.बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment