आपल्यातले मित्र
देवाने आपले शरीर बनवतांना खूप विचार केला आहे .जेव्हा माणसाजवळ कुणीच नसते तेव्हा त्याला एकटं वाटू नये यासाठी आपला मित्रच आपल्या जवळ आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही .दोन मित्र जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा हातात हात घेतात .शेकहन्ड करतात गळाभेट घेतात तेव्हा मनाला आनंद व शांती मिळते पण देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत कधी विचार केला की आपले हात आपण आपल्याच हातात घेतले .ज्यावेळी आपण आपले दोनी हात एकमेकांमध्ये ठेवणार किंवा भजन करतांना किंवा कोणत्याही कार्यक्रमात हास्य विनोद करताना टाळी वाजवतो तेव्हा स्पंदन तयार होतात व शरीरात एक प्रकारची उर्जा निर्माण होते.तसेच दोन पाय कधी एकमेकांना भेटतात का? ज्यावेळी ते एकमेकांना स्पर्श करतात त्यावेळीही विशिष्ट प्रकारची उर्जा निर्माण होते .कधी आपला एक हात व एक पाय .कधी एक हात दोन पाय .कधी दोन पाय एक हात यांची भेट होते स्पर्श रुपी तेव्हा उर्जा शरिरात निर्माण होते व एक प्रकारचा उत्साह आपल्यात निर्माण होतो तसेच दोन डोळे कधी एकमेकांकडे बघतात का ?किंवा तसे त्यांना भेटण्यासाठी आपण प्रयत्न करतो का?तसेच कानांची भेट हवे रुपाने कधी घेतली आहे का? हाताला दहा बोटे व पायांना दहा बोटे व जेव्हा हे एकमेकांना भेटतात तेव्हा एक प्रकारची शक्ती निर्माण होते . एवढ्या जवळ राहूनही आपले अवयव एकमेकांपासून लांब राहतात .ध्यान अवस्थेमध्ये पदमासन मध्ये जेव्हा बसतो तेव्हा पाय एकमेकांशी भेट करतात व हातही एकमेकांत घालून डोळे मिटून दोन्ही डोळ्यांची एकच नजर बनून आज्ञाचक्रात स्थिर करावी व दोन्ही कान त्यावेळी एकच आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच कानही एकमेकांना भेटतात त्यामुळे ध्यान अवस्थेत हात पाय कान डोळे नाकाच्या दोन्ही नासिका एकमेकांना भेटतात व हे सर्वजण एकत्र येऊन एकाच ठिकाणी केंद्रित होतात तेव्हा ते खरे ध्यान होय व या सर्वांना एकत्र आणायचे काम मन करते .मन हे सगळ्यांना वेगवेगळ्या दिशांनाही भरकटवते पण मनाचा दुसरा स्वभाव म्हणजे या सर्वांना एकत्र आणण्याची ताकतही मनामध्ये असते म्हणून आपणच आपल्याला भेटत नाही एकत्र याकडे कुणाकडे लक्ष नसते व जेव्हा एकत्र भेटणार तेव्हा अवयवांचे दु:खही दुर होईल व माणूस निरोगी शांत जीवन जगू शकेल .विशेष म्हणजे जेव्हा या भेटीगाठी होतात तेव्हा त्या भेटीत कोणताही विकार निर्माण होत नाही त्यामुळे आपण त्यांची भेट घडवून आणली पाहिजे व योग करतांना अशा भेटीगाठी होत असतात योग म्हणजे आपलीच आपण घेतलेली भेट म्हणून योग माणसाने रोज केला पाहिजे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment