कोरोना
कोरोनाने अनेकांचे बळी घेऊन
जगात हाहाकार माजवला
कोरोनापेक्षा भयंकर गोष्टी
ठरतात घातक समाजाला
रागानेही अनेकांना जगातून
कायमचे संपवले
त्याच्याबद्दल कुणी नाही बोलत
पण कोरोनाने सगळ्यांना बोलते केले
द्वेष मत्सर हे ही आहेत
कोरोनापेक्षा भयंकर
इतरांचा घात करून
जगातून फेकतात त्यांना दूर
माणसाचा स्वार्थीपणाही आहे
एक प्रकार कोरोनाचा
कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त झालेत
केला घात आपल्याच लोकांचा
भ्रष्टाचार हा काय वेगळा आहे
कोरोना जंतू पेक्षा
अर्थव्यवस्थेला हादरा देऊन
करतात आपल्याच पूर्ण अपेक्षा
देशद्रोह हा आहे
कोरोना सारखाच खतरनाक
आपल्याच देशाचे नुकसान करून
बळी जातात आपल्या बांधवांचे हकनाक
कौटुंबिक हिंसाचार फोफावला
कोरोनासारखा समाजात
तो कायमचा संपवणे
असे नाही कुणाला वाटत
चोरी बलात्कार खून मारामार्या
कोरोनापेक्षा आहेत का हे वेगळे
ठाण मांडून बसलेत समाजात
ते कुणा नाकळे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment