महिला दिन
मुलगी येते जन्माला घरात
आनंदी होतात सर्व जण
करतात लाड तिचे सर्व
भरून जाते आईबाबांचे मन
आकर्षक असते तिचे लाजणे मुरडणे
दिसते ती सूंदर परी
असते हसणे तिचे लोभस
भाष्य ती मंजूळ करी
घराचा असते ती भक्कम आधार
सर्व फिरतात तिच्या अवतीभोवती
सर्वांची घेते नेहमी काळजी
मनापासून जपते आपली नाती
स्रीवाचून पुरूष आहे अपुर्ण
आहे ती पुरूषाची शक्ती
तिचे नसणे म्हणजे सूर्याविन आकाश
म्हणून करावी तिची भक्ती
खाते ती धक्के बस ट्रेनचे रोज
तरी पोहचते कामाला वेळेवर
असतो कामात नीटनेटकेपणा
नाही करत त्यात काही कसूर
सासर माहेर असते तिचे जग
सगळ्यांवर करते ती माया
असते ती दोन्ही घरांचा आदर्श
आधारस्तंभ असतो तिचा राया
स्री म्हणजे आहे सहनशक्तीचा कळस
तिच्यात असतो संयम फार
जेव्हा शिरते तिच्यात दूर्गा
तेव्हा बाकी लोकांनी शांत असलेलें बरं
तिने सुरू केली मुलींची शाळा
झुगारल्या वाईट रूढी परंपरा
घडवला तिने शिवाजी महाराज थोर
म्हणून जग करते तिला मानाचा मुजरा
बनली कधी पंतप्रधान अन् मुख्यमंत्री
जिंकते जनता जनार्दनाचे मन
बर्याच ठिकाणी आहे ती बाॅस
हलत नाही तिच्याविना कोणते पान
तिने दाखवला खेळात पराक्रम
जगाने घेतली तिची दखल
जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर
पुरूषांच्या पुढे मारली मजल
वटसावित्रीला वडाला मारते फेर्या
मागते हाच पती हवा जन्मोजन्मींचा
काही पुरूष असतात मात्र स्वार्थी
म्हणतात हाच जन्म असावा शेवटचा
महिलांचा मानसन्मान करणे
हे आहे पुरूषांचे काम
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून
करतात प्रामाणिकपणे ते काम
प्रत्येक क्षेत्रात रोवला तिने
आपल्या पराक्रमाचा झेंडा
आपल्या बुद्धीची झलक दाखवून
वापरते विविध ज्ञानाचा फंडा
प्रत्येक नाते जपते ती
मनापासून फार
नात्याला किंमत देऊन
नाही जात आपल्या माणसांपासून दूर
आॅफिस आणि घर हे दोन्ही
असतात महत्वाचे तिच्यासाठी
नाही गफलत करत दोघांमध्ये
झटते मात्र दोघांसाठी
काळ्या मातीशी लढून
पिकवते शेतात मोती
दिवस रात्र नाही बघत
शेतीशीच करते मैत्री
आकाशातही मारली भरारी
नाही बघितले मागे वळून
अंतराळातही केला मुक्काम
मनाचा तोल सांभाळून
लष्कर आणि पोलासांमध्येही
दाखवते ती पराक्रम
वेळप्रसंगी झेलून बंदुकीच्या गोळ्या
करते गुन्हेगारांचे काम तमाम
घरात जेव्हा नसते ती
वाटते घर तेव्हा सूनंसूनं
पाऊल पडताच तिचे घरात
घराला येते घरपण
करतो स्री शक्तीला प्रणाम
होऊ दे तिची प्रगती सदा
गालावरती दिसू दे हसणे तिचे
नको दाखवू तिला दु:ख कदा
प्रा. दगा देवरे
रुपारेल काॅलेज मुंबई
7738601925
Comments
Post a Comment