फक्त घरी बसायचं
पोलीसांना पडावं लागत घराबाहेर
आपली कामगिरी बजावण्यासाठी
आपल्या पोराबाळांपासून दूर राहून
झटतात ते आपल्यासाठी
डाॅक्टर नर्सेस घालतात
आपला जीव धोक्यात
करतात रूग्णांची सेवा
जरी नसेल त्यांच्या आवाक्यात
घरी बसणे हिच आपली
समाजासाठी सेवा समजावी
काहींना ते ही नाही जमत
आपण त्यांना शिस्त ही शिकवावी
सफाई कामगार करतात
साफसफाई सगळीकडे
निदान घरी बसल्या बसल्या
आपण लक्ष द्यावे घरातल्या कचर्याकडे
बातम्यावाल्यांचा घसा बसला
घरीच थांबा असे सांगून सांगून
लोकांच्या कानी नाही पडत
गर्दी करतात अफवांवर भरवसा ठेवून
घरी बसून बरंच काहीतरी
करण्यासारखे असते
डोळे उघडे ठेवले तर
बरंच शिकण्यासारखे असते
एकांतात बसून करावी
आपली आपल्याशीच ओळख
शिकून घ्यावी आपण
ओळख करण्याची मेख
राग द्वेष मत्सर करता करता
आयुष्य घातले आपण खर्ची
आपल्या आतील परमेश्वराची
कधीच राखली नाही आपण मर्जी
भौतिक जग आहे भ्रम
सत्य आहे आपल्यातील भगवान एक
याची जाणीव व्हावी प्रत्येकाला
सबका मालिक आहे एक
माझ्यामुळेच चालते सारे
हा व्हावा भ्रम दूर
विश्वापुढे मी आहे थोकडा
याची जाणीव झाली तरी भरपूर
धावत होतो आपण
पैशांसाठी रात्रंदिवस
आपण आहोत कोण
याचा विचार करावा खास
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment