.तू
माणसा कोण होतास तू
काय झालास तू
अरे वेड्या कोरोनाच्या भीतीने
स्वत:ला कोंडून घेतलेस तू
अंतराळात भरार्या मारणारा तू
चंद्रावर पाऊल ठेवणारा तू
न दिसणार्या विषाणूमुळे
घरात डांबून घेतलेस तू
अनेक मिसाईलस निर्माण करणारा तू
सारखा दुसर्या देशावर आक्रमण करणारा तू
तुझ्याच देशात हतबल झालास तू
लसीसाठी प्रयत्न करतोय तू
सारखा परदेश वार्या करणारा तू
घरात कधीच न बसणारा तू
कोरोनामुळे परेशान झालास तू
घराच्या बाहेर आता पाऊल न ठेवणारा तू
घरच्यांचे कधीच न ऐकणारा तू
कायम भिंगरी बांधून फिरणारा तू
मित्रांच्या नादी लागणारा तू
आता निमुटपणे बसलाय तू
तंबाखू सिगारेट ओढायचा तू
दारूशिवाय न राहायचा तू
आता गरम पाणी पित बसलाय तू
असा कसा बदल केलास तू
बाहेर प्रदुषण करायचा तू
गाड्या भरपूर उडवायचा तू
आता जमिनीवर आलास तू
परमेश्वराचे नाव घ्यायला लागलास तू
पैशांसाठी काहीही करायचा तू
त्यासाठी कोणत्याही थराला जायचा तू
आता जीवनाची किंमत करतोस तू
खातो आता चटणी भाकर तू
बाहेरचे नेहमी खाणारा तू
घराच्या जेवणाला नावे ठेवणारा तू
आता जे येईल ते खाणारा तू
घरातले कामं करणारा तू
असा कसा बदलला तू
काही दिवस असाच घरात बस तू
बाहेर जायची हिंमत नको करूस तू
जे आले नशिबी ते स्विकार तू
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment