चिंता आणि चिता
चिंता आणि चिता यामध्ये
फरक आहे फक्त टिंबाचा
चिंता जाळते आतून
चिता जाळते प्रत्येक भाग शरिराचा
चिंतापेक्षा चिता असते
कैकपटीने चांगली
चिंता जाळते रोज
चिता जाळते एकाच वेळी
चिंतेने माणूस रोजच मरतो
अनेक समस्या घेऊन
चिता जेव्हा जाळते
माणूस असतो पडलेला मरुन
चिंता किती करावी
हे असते माणसाच्या हाती
चितेने जाळावे हे असते
आपण सोडून दुसर्याच्या हाती
चिंता जो करतो
तो जीवंत असूनही मेलेला
चिता जे करत असते
ते कधीच समजत नाही माणसाला
चिंता असेल किंवा नसेल
हे ठरवावे माणसाने
पण चिता असते प्रत्येकाच्या नशिबी
हे कायम लक्षात ठेवावे प्रत्येकाने
चिंता जेवढी जास्त केली
तेवढी चिता येते लवकर
चिंता आणि चिता आहेत बहिणी
जात नाहीत त्या एकमेकांपासून दूर
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment