विठ्ठलाला साकडे
का उभा विठ्ठला विटेवरी
हात कमरेवर ठेवून
कोरोनाने मांडला कहर
जरा बघ विटेवरुन उतरुन
जगाचा स्वामी म्हणून म्हणतात
भक्ताचा कैवारी आहे तू
आज का म्हणून गप्प उभा
थोडी दया दाखव रे तू
पुंडलिकासारखी सेवा करतात
डाॅक्टर पोलीस नर्सेस
हे तू बघत असशीलच
तरी का नाही धावून येतोस
जगाचे सर्व व्यवहार थांबले
तुझी मंदिरेही झालीत बंद
तरी तू मौन धरिले
दे आम्हांला परत आनंद
काहीतरी चमत्कार करून
दाखव तुझे अस्तिव
तुझ्या नामाचा जप चालला
येऊ दे जनाची तुला कीव
संपूर्ण जगातून कोरोनाला
गाडून टाक खोल खड्ड्यात
धर त्याची गचांडी
कर त्याचा पूर्ण निप्पात
एवढाश्या विषाणूने मानवाला
घरात राहायला भाग पाडले
तुझ्या पायाखाली चिरडून
कानी पडू दे तू त्याला संपवले
तुझ्याशिवाय कुणाकडे आम्ही
जाऊ रे दयाळू नारायणा
आम्ही सारी तुझी लेकरे
संसार पडला सूना सुना
बस झाले तुझे
विटेवर उभे राहणे
कुणाच्या रुपात येऊन
घे व्रत कोरोनाला मारणे
सोड तुझे सुदर्शन
जसे शिशुपालाला मारले
याचेही पापं झालीत कधीच शंभर
कर धड याचे वेगळे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment