राया
राया मला नको दागदागिने
नको मला भारीची कोणती साडी
आणून द्या मला साधी भाजी
त्यातल्या त्यात हवी मेथीची एक जुडी
नका मला कुठे फिरायला नेऊ
नको जाऊ कोणत्या हाॅटेलमध्ये
घरातच आपण राहू
दंग होऊ या प्रेमाच्या गप्पांमध्ये
राया मला नको गाडी बंगला
नको कोणते नोकर चाकर
तुम्हांला घरीच खाण्यासाठी
देते मी छान ठेचा भाकर
राया मला नको तूप लोणी
हवं मला साधे वरणभात
नको मला पुरणपोळी
करायची आहे फक्त तुमच्याशी खूप बात
राया मला नको काही जीवनात
हवे तुमच्या बरोबर आयुष्य भरपूर
वाटते मला आयुष्याची किंमत
नको जाऊ आपण एकमेकांपासून दूर
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment