ओलावा
ओलावा नसतो ज्या जमिनीत
फुटत नाही बीजाला तेथे अंकुर
ज्या घरात नसतो प्रेमाचा ओलावा
जवळ असुनही असतात ते दुर
ओलावा सुकला जमिनीचा
पिके जातात करपून
आटतो प्रेमाचा जेव्हा ओलावा
माणसांचे नाते जाते तेव्हा संपून
हिरवीगार शेतीत असतो
नेहमीच खोलवर ओलावा
घरातील आनंदी वातावरणासाठी
प्रेमाचा ओलावा हवा
वरवर ओलावा जात नाही
पिकांच्या खोलवर मुळातं
नकली प्रेमाच्या ओलाव्याने
कधीच बनत नाही घट्ट नातं
किड पडते पिकांवर
उपयोग होत नाही ओलाव्याचा
स्वार्थपणा जेव्हा घुसतो
तेव्हा उपयोग नाही त्या प्रेमाचा
खराब बीजाला ओलाव्याने
फुटत नाही कधीही अंकूर
काही माणसांवर प्रेमाचा
कधीच होत नाही असर
आपुलकीचा ओलावा नसल्याने
माणसे बोलत नाही एकमेकांशी
शत्रुत्व नाहीसे करण्यासाठी
संवाद साधा त्यांच्याशी
धरतीही बघते वाट
पाऊसाच्या ओलाव्याची
माणसांनाही गरज आहे
आपल्या माणसांच्या प्रेमाची
काटेरी झुडपांना दिलेला ओलावा
जमीन बेसुरत करतो
वाईट लोकांच्या प्रेमाच्या ओलाव्याने
आपला एकदिवशी घात होतो
मित्रांची ओलावा पार्टी
जीवन बदलून टाकते
सावधानता बाळगली तर ठिक
नाहीतर जीवन बरबाद होते
भगवंताच्या भक्तीच्या ओलाव्याने
भक्त होतात भजनात तल्लीन
देवही नाचायला लागतो
भक्तांची ती भक्ती बघून
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment