70 वर्ष वयानंतर आवराआवर
माणसाचे आयुष्य सरासरी 90 पकडले तर वयाच्या 70 नंतर आवराआवर करायला हवी जसे आपण प्रवासाला निघतो तेव्हा त्याचे नियोजन आपले बर्याच दिवसापासून चालू असते त्यामुळे गोंधळ उडत नाही .काही जणांचे प्रश्न तसेच शिल्लक राहतात मग ते गेल्यावर तमाशे सूरू होतात .वडिल किंवा आई यांच्या नावावर असलेल्या संपतीबद्दल भांडणे निर्माण होतात.एक बोलतो मला ही जमीन नको ती हवी मग हाणामार्या कोर्टकचेरी चालू होतात भावा भावांमध्ये शत्रूता निर्माण होते भाऊ बहिणी मधील नाते संपूष्टात येते.पण जर का जीवंत असतांना आपल्या मुलांना बोलवून सामोपचाराने त्यांची वाटणी करून दिली तर तंटे होणार नाहीत व संबंध ही चांगले राहतील म्हणून वयाच्या 70 नंतर या गोष्टी तडीस लावायला हव्यात . राजकारणी लोकांचे 70 वय म्हणजे तरूण पण मग त्यांनीही देशाची सेवा चांगली करायला हवी त्यांना मिळालेली ती एक संधी असते लोकांची सेवा करण्याची पण काही आपल्या सात पिढ्या आनंदात जीवन कसे जगतील याची सोय करण्यासाठी धडपड करतात व त्यामुळे आवराआवर त्यांची राहूनच जाते हव्यास सोडून मी उरलो उपकारापूरता अशी भावना निर्माण व्हायला हवी वास्तविक रिटायर झाल्या नंतरचे आयूष्य हे बोनस म्हणूनच समजावे व त्यावेळेस जास्तीत जास्त कुटूंबासाठी व समाजासाठी वेळ द्यायला हवा .नाहीतर मरेपर्यंत पैसा स्वत:सांभाळून ठेवला तर मुले व सूना त्याच्या मरणाची वाट बघतात .तुमच्यामुळे भावनिक आधार वाटायला हवा व सोडायची भावना जपायला हवी पण तेही मुले बघून नाहितर मुलांच्या हवाली सर्व करून तुम्हालाच ते निराधार करणार शेवटी तुमचे संस्कार तुम्ही काय केलेत त्याचीच ते परतफेड करणार.70 नंतर तुम्हाला कोणाला भेटायचे राहून गेले त्याला भेटा कुणाची माफी मागायची होती ती मागा कुणाला दानधर्म करायचा होता ते करा फक्त कुणाचा बदला घ्यायचा ते मात्र करू नका त्याला माफ करा व त्याचे कर्म त्याच्याबरोबर असे समजून सोडून द्या .कुठे जायचे असेल तर जावून या काही आवडीचे राहिले असेल ते खा.समाधानाने उरलेले आयूष्य जगा एकटं जगण्यापेक्षा मुला नातवंडात वेळ घालवा नाहीतर भजन किर्तन संतसंग यातूनही आनंद मिळवता येतो आपले मन विकारांपासून कसे मोकळे होत जाईल असे करा .निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा .असे करणे म्हणजेच जायची आवराआवर .जेथे पैसे असतील त्याची कल्पना मुलांना द्या फिक्स पावतीची माहिती द्या व नाॅमिनेशन कुणाला केले त्याची कल्पना द्या.तुम्ही गेल्यानंतर घरच्यांची तारांबळ होणार नाही असे करा .त्यांना त्रास होणार नाही असे बघा नाहीतर मेल्यानंतरही शिव्या देणार.तुम्ही गेल्यानंतर सुध्दा तुमचे विचार व आचार त्यांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतील असे करा .काहींना वाटते आपल्याला कधीच जावे लागणार नाही अशा भ्रमात राहतात व सर्वच आवराआवर राहून जाते काहींना आवराआवर करू न देता ऐन तारूण्यातच तो जातो याबाबतीत अपवाद असतो शेवटी प्रत्येकाचे नशिब असते . मेल्यानंतर कावळ्यामध्ये तुम्हाला शोधण्यापेक्षा मुलांनी जीवंतपणीच त्यांना हवे ते द्या व त्यांनीही मुलांना समजून घेतले पाहिजे तरचं बॅलन्स साधता येईल.ते गेल्यानंतर पूर्ण गावाला त्यांच्या नावाने जेवण देण्यापेक्षा त्यांना जीवंतपणीच तृप्त करा बघा पटतात का विचार व जमतं का बघा
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment