Skip to main content

विचार

विचार

विचार  हे मनाचे खाद्य आहे जसे विचार मनाला पुरवणार तसे मन बनते .एकातांत असतांना मनात विचारांचे काहूर माजते ते विचार बहुत करुन विकारांना जन्म देतात.आपल्या मनात विकार निर्माण करणारे विचार जास्त येत असतात व त्यावर जर मात केली नाही तर ते आपल्याला अधोगतीला नेतात जसे पाणी नेहमी उतार्‍याकडेच धावते व चढत्या बाजूला न्यायचे असेल पाणी तर मात्र मोटर इंजिनचा वापर करावा लागतो म्हणजे साधनांचा वापर केल्यानेच पाणी चढत्याकडे जाते पण  साधनांचा वापर न  करता पाणी सहजच उतार्‍याकडे धाव घेते त्याचप्रमाणे विकारांकडे धाव घेतांना मनात कोणतेही कष्ट न करता विचार येतात व त्यावर दाबा ठेवणे फार अवघड असते जर दाबा ठेवण्याची कला नसेल तर ते विचारआपल्याला रसातळाला नेतात पण  बिनविकारी बनायचे असेल तर तो चढता मार्ग आहे सहजा सहजी बनने अशक्य असते तेव्हा संतानी साधनांचा वापर सांगितला आहे त्या साधनांचा वापर केला तर विकारी विचारांना थांबवता येते .जेव्हा विकारी विचार येतात तेव्हा थोडे मन शांत करण्याचा प्रयत्न करावा जसे मन शांत करण्याचा प्रयत्न करणार तेव्हा ते अधिकाधिक विकारी विचार  मनात येतात व मन बंड करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्यावर जबरदस्ती केली तर ते अधिकच क्रुर होते व त्यावर दाबा ठेवणे अशक्य असते तेव्हा त्यावर जबरदस्ती न करता त्याला दुसरीकडे वळवावे .देवाचे नामस्मरण करावे .नाही जमले तर एखादा चांगला प्रसंग आठवावा किंवा एखाद्या महापुरुषाचे स्मरण करावे किंवा आपल्या आईवडिलांचे स्मरण करावे मग ते मन त्यावेळेसाठी थोडे शांत होते मग शांत होण्याचा कालावधी हळुहळु वाढवावा मग त्यालाही हळूहळू सवय लावावी मग जेव्हा विकार निर्माण करणारे विचार मनात आले की  मग वरील गोष्टी कराव्या .एकदा का त्याला कळले की माझ्यात विकारी विचार जेव्हा येतात तेव्हा दुसरीकडून चांगल्या गोष्टींचे स्मरण सुरु होते व विकारी विचारांवर मात होते म्हणून साधनांचा वापर करुन आपल्याला अधोगतीला नेणारे विचार थांबवून वरच्या दिशेला म्हणजे चांगल्या गोष्टीकडे प्रगतीकडे नेणारे विचार वरील साधनांचा वापर करुन नेता येतात त्यामुळे जरी आपण एकटे असलो तरी मनात वाईट विचार येणे हळूहळु थांबते व चांगले विचार यायला सुरु होते त्यामुळे एकांतात आपल्याला शांतीचा अनुभव येऊ लागतो व सुखाची प्राप्ती होते .सुख हे बाहेर नसून ते आत असते व त्याचा खजिना आपल्या हाती लागतो त्यामुळे भौतिक गोष्टींमुळे मिळणारे सुख हे तुच्छ वाटायला लागते म्हणजे आपल्याला  मिळालेला पुरस्कार आपल्या विषयी कुणी काढलेले कौतुकाचे शब्द यामुळे माणूस हूरळून जात नाही कारण आपल्याकडून एखादी चूक झाली तर लोक आपण 99 केलेल्या चांगल्या गोष्टी विसरतात व त्या एका गोष्टीवर बोट ठेवून आपल्याला बदनाम करतात म्हणून बाहेरील सुख हे क्षणिक असते .आज लोक तुम्हांला डोक्यावर घेणार व उद्या तुमच्याकडून काही चुकीचे अजाणतेपणे झाले  तर तेच लोक पायाखाली चिरडणार .बदनामी करणार म्हणून बाहेरच्या सुखाला न भूलता आतील सुखाचा खजिना सापडला तर मात्र बाहेरील सुख वदु:ख याचा काहीही  आपल्यावर परिणाम होत नाही किंवा बाहेरील सुख दुखाने माणूस विचलित होत नाही व हे आतील सुख परमेश्वराच्या सतत चिंतनाने  तसेच निस्वार्थ कर्म करण्याने प्राप्त होत असते म्हणजेच भक्तियोगाने किंवा कर्मयोगाने प्राप्त होते व ते एकदा प्राप्त झाले की मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व जीवन सार्धक झाल्यासारखे वाटते .समदृष्टी निर्माण होते आपला परका हा भाव नष्ट होतो मरणाची भीती नष्ट होते बाहेरील चांगल्या वाईटाचा परिणाम होत नाही मानाची अपेक्षा नसते की अपमानाने विचलित होत नाही व काय काय दिसायला लागते व काय काय अनुभव यायला लागतो हे शब्दांत सांगणे कठिण असते जसे मिठाची पाण्याशी भेट होते तेव्हा मिठाला अस्तित्वच उरत नाही की पाण्याशी भेट झाल्यावर काय होते तसे आतील सुखाची प्राप्ती झाल्यावर  अस्तित्वच उरत नाही की काय काय होते सांगण्यासाठी.म्हणून चांगले विचार हिच आपली संपत्ती आहे वत्या संपत्तीमुळे आपल्याला शाश्वत सुखाचा अनुभव घेता येतो.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...