राग आणि शांतता
माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत शांतता व राग.जीवनाचे दोन टोक आहेत राग आणि शांतता .एकमेकांपासुन कायम ते लांब असतात . एकमेकांत ते गुंतलेले असतात पण दिसतांना ते टोकाचे वाटतात .राग आणि शांतता एका म्यानात कधीच राहत नाही .एक संपला की दुसर्याचा जन्म होतो .राग आणि शांतता दोन्हीही प्रत्येकाच्या शरिरात असतात .त्यांना पोषक वातावरण मिळाले की ते उत्पन्न होतात .राग हा धुळधाण करुन टाकतो .नातेसंबंध हा राग तोडून टाकतो .शरीरात ज्या ज्या वाईट शिव्या , वाईट शब्द असतात ते बाहेर फेकल्याशिवाय म्हणजे समोरच्याला ऐकविल्या राहत नाही.रागाने सदविवेक बुद्धी नाहीशी होते . माणसाच्या संबंधामध्ये मजबूत भिंत हा राग निर्माण करतो त्यामुळे सख्खे नातेवाईक रागामुळे दूर जातात .जे होऊ नये ते रागाने होते .घर तुटण्याला हाच राग कारणीभूत असतो .माणसा माणसातील प्रेम आदरभाव हा राग नष्ट करुन टाकतो.रागाने मारलेले शब्द माणसाच्या मनावर कोरले जातात .झालेली प्रगती राग एका क्षणात धुळीला मिळवतो.त्याउलट शांतता असते .कोणताही वाईट प्रसंग निर्माण झाला तरी शांतता मनात असली की त्यावर मात करता येते .शांततेने अचूक मार्ग काढता येतो ..शांतता म्हणजे पळकुटेपणा नाही तर सर्व प्रश्नांवर उत्तर शोधण्याची ती गुरूकिल्ली आहे पण ती शरीरात रुचवणे एवढे सोपे नाही .शांततेचे बीज सहजा उपलब्ध कुठे नसते पण एकदा ते मिळाले व त्याला खतपाणी घातले की त्या शांततेचा वृक्ष तयार होतो व त्या वृक्षाखाली मोठे मोठे रागाचे पर्वत नाहीसे होतात .सर्व सुखाचा खजिना हा शांततेच्या मार्गावर सापडतो आणि ज्याच्या अंगी शांतता नांदते तेथे देवही राहायला येतो .शांततेने अचूक निर्णय घेता येतो .शांततेमुळे मन स्थिर होते व त्यामुळे मोठेमोठे कार्य करता येते .ज्याच्या मनात शांतता असते त्या माणसाकडून कोणतेही वाईट कृत्य घडत नाही.सारासार विचार करण्याची वृती वाढते.तो माणूस ज्या ठिकाणी जाईल त्या जागेवर शांततेच्या लहरी निर्माण होतात व अवतीभवती इतर माणसांनाही शांततेचा अनुभव येऊ लागतो.मनातील शांततेमुळे ध्यान लागते .ध्यान लागली की मग समाधी लागते मग अशक्यप्राय गोष्टी त्या माणसाच्या हातून होतात .रागाने धुमाकुळ घातल्याने जी शांतता निर्माण होते ती भयावह शांतता असते .त्या शांततेने भिती वाटते.रागाला कायमस्वरुपी शरिरातून जी हाकलून लावते ती खरी शांतता व जेव्हा अन्याय आपल्या समोर होतो तेव्हा ही शांतता खोटे खोटे रागाचे रूप घेते व तो अन्याय हाणून पाडते .मग विचार करू या की शांततेला आत ठेवायचे की रागाला .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment