Skip to main content

इचाछा

इच्छा तिथे मार्ग दिसे

आपल्या मनात सकारात्मक व नकारात्मक विचार सतत येत असतात.ज्या विचारांची तीव्रता जास्त असते ते विचार आपल्या मनावर राज्य करतात आणि जसे विचार तस मन बनते वएकदा मनात विचार आलेत की त्यांची frequency वातावरणातील frequency शी जोडली जाते त्यामुळे वाईट विचार असतील मनात तर वातावरणातील वाईट विचारांशी मेळ होतो व तसे माणसे  तशी परिस्थिती भेटते.समजा एखाद्याला दारू सिगारेट बीडी तंबाखू खाण्याची किंवा पिण्याची इच्छा झाली तेव्हा त्या प्रकारचे लोक त्यांना भेटतात.एखादा अध्यात्म मार्गावर चालत असेल तर त्याला त्या मार्गावर प्रवृत्त करण्यासाठी असलेले मार्ग येऊन मिळतात जसे मोबाईलवर नंबर dial केल्यावर त्या नंबरशी frequency जोडली जाते व समोरचा मोबाईल वाजू लागतो त्याचप्रमाने आपण केलेली इच्छा तीव्र असेल तर त्या इच्छेप्रमाणे   असलेले माणसे भेटतात म्हणून वातावरणात सर्व available आहे जसा आपण विचार करणार तसे जुळुन येते त्यामुळे दारुड्या माणसाला दारूड्या भेटतो .वारकर्‍यांना वारकरी भेटतात.व्यापार्‍यांना व्यापारी भेटतात त्यामुळे मनात चांगले विचार आणले तर चांगली माणसे भेटतात.मनात विचार येणे हे input आहे व त्या विचारांचे कार्यात रुपांतर होणे हे output आहे.input चांगले असेल तर output चांगलेच येते. आपल्या मनात रागाची तीव्रता एखाद्याबद्दल असेल तर ती व्यक्ती दिसल्यावर ते output रागाच्या रुपात बाहेर पडते .एखाद्या बद्दल खूप प्रेम वाटत असेल तर ती व्यक्ती दिसताच आपण हातात हात घेतो किंवा आलिंगन देतो .मन शांत असेल तर सगळीकडे शांततेचा भास होतो  कारण मनातील शांतता वातावरणातील शांततेशी जोडली जाते व मग मनात शांततेचा ओघ सुरु होतो व अशांत असेल तर चांगली गोष्टही आवडत नाही तसेच चांगली माणसेही दिसत नाही कारण वातावरणातील अशांतता आपल्या मनातील अशांततेकडे आकर्षित होते त्यामुळे सगळीकडे आपल्याला अशांतता दिसायला लागते त्यामुळे कोणतेही काम धड होत नाही म्हणजेच आपल्या विचारांवर बरेच काही अवलंबून असते .बघा पटतं का?

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...