Skip to main content

तो बघतो आहे

तो बघतो आहे

प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रांत काम करत असतो व त्याचा मोबदला आपल्याला एकतर पैशारुपाने मिळत असतो नाहीतर आनंदाच्या स्वरुपात किंवा दु:खाच्या रुपात मिळत असतो .आपण शिक्षक असाल  डाॅक्टर इंजिनिअर किंवा अजून कोणत्या खात्यात असाल त्या ठिकाणी बरेच जण मिटिंगला वेळेवर न जाणे कामाला वेळेत न पोहचणे .कामाला गैरहजर राहूनही कामाला हजर दाखवणे .दिलेले काम प्रामाणिकपणे न करणे किंवा कसे तरी उरकवणे .आपल्या खात्यात अफरातफर करणे .नियम धाब्यावर बसवणे .कामावर शरीररुपाने हजर राहणे पण काम मात्र घरचे करणे .कामाच्या ठिकाणावरुन घरचा कारभार चालवणे अशा असंख्य गोष्टी आहेत कामचुकारपणाच्या.आपल्याला जो कामाचा मोबदला मिळतो तो खरंच आपल्या वाट्याला आलेले काम अगदी प्रामाणिकपणे 100% करण्याचा प्रयत्न केला का? पण बरेच जण म्हणतात कोण बघतो? कुणी बघत नसेल पण तो मात्र बघत असतो व तो म्हणजे नियती व ती वेळ आल्यावर आपल्या कामाचा हिशोब पुरता करते.एक एक आपल्या कामाचा ती हिशोब ठेवते .जर प्रामाणिकपणे काम केले असेल तर ती सुखाच्या राशी प्रदान करते व काम न करताच पैसे घेतले असतील तर मात्र तेवढ्यापुरते चांगले वाटते पण तो फुकटचा पैसा व्याजासकट ती मात्र परत घेते .कुणीतरी आपल्याला बघतो आहे हे जर मनात ठेवले तर नक्कीच आपल्या हातून प्रामाणिकपणे काम होणार.जेव्हा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये तिकिट न काढताच बसलो तर आपल्याला कुणीतरी बघतो आहे फुकटचा प्रवास करतांना व त्याचे पैसे एक दिवस व्याजासकट परत करावे लागतील असा विचार नेहमी मनात ठेवावा मग आपण टीसीच्या भीतीने तिकिट न काढता त्या नियतीच्या भीतीने तिकिट काढून बसणार .दर महिण्याला जरी सरकार पगार देत असेल तरी तो घेतांना खरंच आपला हा पगार प्रामाणिकपणे काम करण्याचा आहे का असा विचार करावा किंवा काही खात्यात पगाराव्यतिरिक्त भ्रष्टाचाराने जो पैसा खिशात घालतो तो एक दिवशी कितीतरी टक्क्याने आपल्याला परत करावा लागणार असा विचार मनात आणावा मग नक्कीच आपल्या हातून असा पैसा आपण घेणार नाही.असे विचार सतत मनात आणल्यावर एखाद्या दिवशी आपल्या हातून अप्रामाणिकपणे घडले तर आपले मन आपल्याला बोचते व शांत झोप लागत नाही कारण आपल्या आतमध्ये तो आपल्याला सांगत असतो हे बरे नाही केले तू.जीवनभर वाम मार्गाने मिळवलेला पैसा उतारवयात आजारात खर्च होतो नाहीतर मुलांकडुन तो खर्च केला जातो आपल्या अप्रामाणिकपणाची सजा पूर्ण कुटुंबाला सोसावी लागते.म्हणून कोणतेही काम करताना तो परमेश्वर बघत आहे असा विचार करावा मग बघा कसे छान काम आपण रोज करणार .वेळेवर कामावर जाणार व तेथे गेल्यावर time pass न करता जास्तीतजास्त आपण देण्याचा प्रयत्न करणार.बर्‍याच गावात शहरात तलाठी ग्रामसेवक  वायरमन मोठे अधिकारी हे कधीच आठवड्यातील सर्व दिवस हजर नसतात व असतील हजर तर दिलेल्या वेळेत कधीच येत नाही .नोकरदार म्हणजे जनतेसाठी सेवक असतो ही भावना दुर ठेवून आपण एक अधिकारी आहोत व अधिकार लोकांवर गाजविण्यासाठी आपली नियुक्ती झाली आहे अशा जगात ते वावरतात त्यामुळे त्यांच्या हातून खरी सेवा घडत नाही. कितीतरी डाॅक्टर आपल्या पेशंटकडून पैसे उकळतात.दुकानदार मालामध्ये भेसळ करतात .दुध विकणारे दुधात पाणी मिसळतात .असे तेच लोक करतात जे त्या नियतीलाही घाबरत नाही पण वेळ आल्यावर त्याला हिशोब हा द्यावा लागणार तसेच आपल्यावर कुणी उपकार केले असतील व आपण ते विसरुन गेलो सत्तेच्या मस्तीत तर त्याचीही परतफेढ आपल्याला एक दिवशी करावी लागते म्हणून प्रामाणिकपणे काम करत राहणे असा नियम बनवला तर मग आपले कुणीच वाईट करु शकत नाही.एखाद्या माणसाचे आपण न केलेल्या कामामुळे त्याच्या मनातील निघणारे आपल्याविषयी वाईट भावना आपल्या जीवनावर  परिणाम करते पण जेव्हा आपण चांगले काम करुनही जर कुणी वाईट बोलत असतील आपल्याविषयी तर त्याचा परिणाम आपल्यावर न होता त्या बोलणार्‍या व्यक्तीवर होतो म्हणजेच आपणच आहोत आपल्या जीवनाचा शिल्पकार.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...