सुखाची गंगा
जीवनात फिरलो भटकलो
दमलो पायपीट करुन
सुख शोधत होतो
नव्हते थार्यावर माझे मन
मंदिर मज्यिद चर्च
सगळीकडे सुख शोधले
गर्दी गोंगोटाने मन माझे
मलिन मात्र झाले
तिर्थस्थानी मी फिरलो
डोंगरमाथी सर केली
नाही गवसले सुख मला
शेवटी मनाला मुरड घातली
स्वप्नी माझ्या तुझे रुप पाहिले
मनशांतीचा अनुभव मिळाला
तुझ्या चरणाशी सुखाची गंगा पाहून
मला परमानंद झाला
तुझ्या चरणाशिवाय नको मला
काही दाखवू देवा
वाहते सुखाची गंगा चरणाशी
मी त्यात डुबकी मारली रे रावा
विसरलो सारे संसाराचे दु:ख
तुझ्या सुखाच्या गंगेत
नको दूर लोटू मला
नाही तुझ्याशिवाय चिंतन माझ्या मनात
सुखाची गंगा झुळुझुळु
वाहे तुझ्या चरणी
आणिक नको काही
मागणे माझ्या मनी
संसाराचे ताप गेले वाहून
तुझ्या चरणाच्या गंगी
आनंदाचे भरते आले
देवा माझ्या अंगी
तुझ्या चरणाहून आहे
संसारातील सुख थोकडे
का वाया घातले आयुष्य
होऊन ते रोकडे
सुखाची गंगा ठेविली
तू आपुल्या चरणी
असा कसा रे तू देवा
राहतो सगळ्यांच्या अंतकरणी
माणूस आहे अज्ञानी
शोधतो सुख आपुल्या संसारी
शोधता शोधता सुख
लोकं झालीत म्हातारी
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment