पितर
पितरांचा करू या सन्मान
होते ते आपल्या जीवनाचा भाग
दिसली दुनिया त्यांच्यामुळेच
होते ते जीवनात वाघ
घरदार पैसा अडका
सोडून गेले कायमचे दूर
राहिल्या फक्त आठवणी
येतात नेहमी डोळ्यांसमोर
सगळे जण होणार
पितर एक दिवशी
त्याची आठवण ठेऊन
चांगले काम करावे दर दिवशी
करावे पुजन जीवंत माणसाचे
ते पितर होण्याआधी
करावा ठेवावा त्यांचा मान
दु:ख देऊ नये त्यांना कधी
पितरांचे चांगले गुण
आणावे आपल्या मती
हिच ठरेल त्यांची पुजा
त्यासाठी पाहू नये कोणती तिथी
जीवंतपणी नाही दिले सुख
मृत्यूनंतरची सेवा नाही उपयोगाची
जे करावे ते त्यांच्या जीवंतपणी
मृत्यूनंतरही बरसात करतील आशिर्वादांची
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment