निवृत्ती
प्रत्येकजण होतो निवृत्त
आपल्या असलेल्या नोकरीतून
ती नक्कीच घडणार असते
इच्छा नसतांना मनातून
निवृत्त करावे आपल्याला
लागलेल्या व्यसनाला
कधीच फिरकू देऊ नये
कायमची मुठमाती द्यावी त्याला
शंका गैरसमज स्वार्थीपणा
यांना करावे निवृत्त
मनातला कचरा करावा दूर
त्याने होईल मन शांत
आजारांना करावे निवृत्त
योगा प्राणायाम करुन
नित्यनेम जरुर ठेवावा
चांगल्या सवयी लावून
निवृत्त करावे कायमचे
पुढे आलेल्या पोटाला
खाणे नियंत्रित ठेऊन
कधीतरी आराम द्यावा त्याला
निवृत्ती द्यावी मनात
येणार्या वाईट विचारांना
चांगल्या विचारांना मिळेल जागा
त्याचा होईल उपयोग ध्यान करतांना
निवृत्ती द्यावी कायमचीच
आपल्या निरर्थक बडबडीला
शब्द वापरावा जपून
महत्व द्यावे कधीतरी मौनाला
निवृत करावे आळसाला
चांगल्या कामात गुंतवून
नेहमी राहावे हसतमुख
त्याने दु:ख जाईल पळून
निवृत्त करावे दुसर्याची
निंदा करणार्या विचारांना
कौतुकाचे शब्द यावेत मुखी
त्याने आनंद होईल दुसर्यांना
निवृत्त करावे मनातून
नकारात्मक दृष्टिकोनाला
दुनिया दिसू लागेल चांगली जेव्हा
सकारात्मक दृष्टी लाभेल आपल्याला
दगा देवरे
Comments
Post a Comment