स्वत:वरील प्रेम
राहूनच गेले स्वत:वर
मनापासून प्रेम करायचे
अडीअडचणींचा सामना करत
स्वत:कडे दुर्लक्ष झाले कायमचे
भाकरीचा चंद्र मिळविण्यात
खर्च झाले बरेच दिवस
स्वत:च्या भावभावनांचा कधीच
विचार केला नाही खास
आपल्या आवडीचा कधीच
विचार आला नाही मनात
बरेच वर्ष निघून गेले
इतरांचा विचार करण्यात
वजन वाढले पोट सुटले
झाले दुर्लक्ष माझ्याकडे
अनेक आजारांनी डोके वर काढले
वेळ निघून गेली आता फार पलीकडे
देवाचे भजन करायचे होते मला
वेळेचे गणितच नाही जमलं
सारखा धावत होतो मी
पण सुख मला नाही कळलं
वाचन चिंतन मनन बरोबर
शांती साधायची होती मला
मी म्हणजे एकटाच ज्ञानी
ही भ्रामक कल्पना होती मला
निसर्गाच्या सानिध्यात भटकंती
करायची होती मला
मी मी तू तू करण्यातच
वेळ मात्र मी वाया घालवला
आपल्यावाचून कुणाचचं अडत नाही
हे पटलं मला मनापासुन
एवढे वर्ष उगीच वाया गेले
स्वत:चे जगणं गेले राहून
माझ्यासारखे किती आले अन् गेले
हे समजण्यास झाला मला उशिर
ज्याला योग्यवेळी गुरू भेटला
त्याचे नशीब असते मात्र थोर
अजुन वेळ गेली नाही
हे मला आज कळलं
देवाचे मानतो आभार
त्याच्यामुळे मला सत्य पटलं
प्रा. दगाजी देवरे
Comments
Post a Comment