माझे काय आहे?
माणूस येतो जन्माला
काहीच हातात नसते
घरचेच नाव ठेवतात
तेच नाव त्याला चिकटते
माझी खेळणी करत करत
रमतो माणूस खेळण्यामध्ये
हात लावताच दुसर्याने
पटाईत होतो मारामारीमध्ये
माझे कपडे माझे बूट
माझा मोबाईल यात गुरफटतो
माझे माझे करत करत
सगळ्यांमध्ये अडकून पडतो
माझे घर माझी गाडी
माझे शेत माझे पद यात रमतो
माझा संसार माझे पैसे
माझी मुले यात शेवटी फसतो
मी केले मी करुन दाखवले
असा घुसतो शरीरात गर्व
माझे शरीर माझी संपत्ती
हेच मानतो स्वत:चे सर्व
मृत्यू जेव्हा मारतो झडप
तेव्हा शरीरही नसते स्वत:चे
माझे माझे राहते सर्व जागी
मग आपण नक्की कुणाचे
ज्याला म्हणत होते माझे माझे
तेच काढतात घराच्या बाहेर
कवटी फुटली कळल्याशिवाय
गाठत नाही ते आपले घर
जो आपला आहे खरा
त्याच्याशी राहतो आपण दूर
तोच असतो आपला सखा
त्याचे नाव आहे परमेश्वर
दगा देवरे
Comments
Post a Comment