Skip to main content

दुरुन डोंगर

दुरुन डोंगर साजिरे

जर आपण डोंगर बघितला लांबून तर तो एकदम सुंदर दिसतो त्यावर दगड दर्‍या वर खाली असे काहीच दिसत नाही पण जर आपण त्याच्या एकदम जवळ गेलो तर लहान मोठे दगड , लहान मोठ्या दर्‍या ,झाडेझुडुपे असे अनेक प्रकारचे आपल्याला दिसते त्यामुळे दुरुन पाहिलेला सुंदर डोंगर व जवळून पाहिलेला तोच डोंगर यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो तसेच माणसाच्या बाबतीत असते जोपर्यंत माणूस  आपल्यापासुन लांब असतो तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटते कारण त्याचे गुण आपले ऐकलेले असतात  .अवगुण जरी असले तरी ते आपण गांभिर्याने घेत नाही फक्त गुणांचाच विचार करतो पण त्या व्यक्तीजवळ जसजसे जवळ जाऊ तसेतसे त्या माणसाबद्दल आपल्याला कळायला लागते व फारच जवळ गेल्याने त्याच्यातले अवगुण दिसायला लागतात व ते अवगुण जास्तच असले तर चांगले गुण झाकले जातात व फक्त आपल्याला अवगुणच दिसतात तेव्हा माणूस बोलू लागतो की तुला मी काय समजले होते व खरा तू वेगळाच आहे त्यामुळे लांब राहून जे प्रेम असते ते जवळ आल्यावर नाहीसे होते म्हणूनच लग्नाआधी जे प्रेम वाटायला लागते ते लग्नानंतर राहीलच याची शाश्वती नसते कारण त्या व्यक्तीमधील अवगुण आपल्याला दिसायला लागतात जर गुण व अवगुण सहित स्विकारायची आपली मनाची तयारी असेल तर शांतता नांदते व जर अवगुण स्विकारायची तयारी नसेल तर खटके उडतात तसेच भाऊ भाऊ  आई  वडिल काका मुले  सुना सासु ह्या जवळ असल्या जास्त दिवस तर मग प्रेम कमी होते व अवगुणांची चर्चा जास्त होते त्यामुळे नात्यांमध्ये ओलावा ठेवायचा असेल तर लांब राहून तो जास्त राहतो वजवळ राहूनही काहींचा राहतो कारण ती व्यक्ती जशी आहे तशी स्विकारण्याची मानसिक तयारी असते व जर नसेल तर कलह ठरलेलाच असतो.बघा पटतं का?
दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...