तीन गोष्टी
तीन गोष्टींना असते
जीवनात फार महत्व
आहेत तीनच गुण
तामस रज अन् सत्व
विश्वात महत्व आहे
फक्त तीनच देवांना
ब्रह्मा विष्णू महेश
असे म्हणतात त्यांना
महत्वाच्या तीनच गोष्टी
असाव्यात माणसाच्या मनी
दया क्षमा शांती असावेत
माणसाच्या सुंदर जीवनी
अनेक झाडांना असतात
विविध प्रकारचे पाने
नाव मात्र घेतले जाते
पळसाला तीनच पाने
स्वर्ग मृत्यू पाताळ
हे ही आहेत फक्त तीनच
त्यांचा सांभाळ करणारे
आहेत देव तीनच
डोकं धड आणि पाय
हे आहेत शरीराचे भाग तीन
ते असावेत धडधाकट
यासाठी प्रसन्न असावे मन
दिवसाचे आहेत भाग तीन
सकाळ दुपार संध्याकाळ
माणूस अडकतो यात
त्यासाठी नाही बघत वेळकाळ
पावसाळा हिवाळा उन्हाळा
ही आहेत तीन मौसम
देतात जगायला प्रेरणा
करतात ते आपआपले काम
आई वडिल आणि गुरु
हे तीन आहेत महत्वाचे
त्यांच्या आशिर्वादाने जीवन
होते प्रगतीपथाचे
दत्त दत्त दिगंबरांना
आहेत तीन मुख
त्यांचे दर्शन घेताच
वाटते मनाला खूप सुख
बालपण तारूण्य म्हातारपण
आहेत शरीराच्या तीन अवस्था
प्रत्येकाला जावे लागते यातून
जीवन जगण्याची सुटत नाही आस्था
जीवनात तीन गोष्टीचीच
आहे चर्चा सगळीकडे
तीन तिघाडा काम बिघाडा
असे म्हणतांना का दिसतात चौहीकडे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment