Skip to main content

मन

मन
प्रत्येकात मन असते पण दिसत नाही .ते मात्र आपले काम चोख बजावत असते ते स्वत:हून काहीच करत नसते .आपण त्याला जी सवय लावली ती घेतो व नियमीतपणे पार पाडतो म्हणजेच त्याला वाईट सवय लावली तर आपल्या नाशाला तो कारणीभूत होतो व चांगली लावली तर मात्र प्रगतीच्या शिखरावर बसवतो .एखाद्याला दारूची सवय लागली तर तो ज्या वेळेला दारू पितो त्या वेळेला ते मन त्याला आठवण करून देते व असे काय त्याच्या मागे लागते की दारू पिल्याशिवाय त्याला शांतच बसू देत नाही काहीं जण गुटखा तंबाखू बिडी सिगारेट ची सवय लावून घेतात मग तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामात असलात तरी मन त्याला सांगते उठ आणि ते तोंडात टाक .ते घेतल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही व मन ते घेतल्याशिवाय त्याला शांत बसू देत नाही 
            काहीजण सकाळी वाॅकिंग योगा प्राणायाम यांची सवय लावून घेतात मग सकाळ झाली की मन मागे लागते व ते करायला त्याला भाग पाडते काहीजण झोपतांना देवाचे भजन किंवा नामस्मरण करून झोपतात तसे नाही केले तर मन त्यांना स्वस्त बसू देत नाही काहींना वाचनाची सवय असते काहींना गाणे गायची काहींना चित्रकलेची  .जी जी सवय तुम्ही त्याला लावली तसे तसे त्या वेळेला तो आपल्याला करायला भाग पाडतो व एकदा का सवय लागली तर ती सूटणे फार अवघड .काहींना सकाळी चहा घेतल्याशिवाय तसेच काहींना तंबाखू बिडी सिगारेट  घेतल्याशिवाय  पोट साफ होत नाही .अशा घाणेरड्या सवयी आपणच लावून घेतो .त्या सुटण्यासाठी मनाचा प्रचंड निग्रह असावा लागतो त्यासाठी त्याला गोंजारून समजावून  सांगून हळू हळू त्या सवयी सोडता येतात.ज्याचे मन कमचोर त्याला त्या सवयी सोडताच येत नाही .आपण बघतो काहींना ज्या वाईट सवयी लागलेल्या असतात त्या वाईट आहेत हे वरून ब्रम्हदेवही उतरला तरीही तो ऐकायला तयार नसतो कारण मनाने त्याच्या शरीरावर एवढा ताबा घेतला आहे की त्याच्या जोखडातून बाहेर पडणे अशक्य .काहींचे जीवन कोळ्यासारखे आहे कोळी आपले जाळे विणतो व त्या जाळ्यात स्वत:च अडकून पडतो तसेच माणूस सवयी लावून घेतो व त्यात एवढा अडकतो की बाहेर पडणे मुश्किल होते 
       म्हणून चांगल्या सवयी लावल्या की मन आपल्याला मान सन्मान मिळवून देते .काही एवढे कणखर असतात की मनाचे काहीही चालत नाही ते मनाला हूकूम सोडतात की मला हे करायचे आहे पण काहींना मन सांगते तुला हे करायचे आहे व ते मन पुढे पळते व आपल्याला खेचून नेते .काहींना तर फरपटत नेते .बघा विचार करा मन तुमच्यावर राज्य करते की तुम्ही मनावर?
प्रा दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...