Skip to main content

सीमारेषा

.सीमारेषा
प्रत्येक गोष्टीची एक सीमारेषा असते मग धावण्याची शर्यंत असो कुस्तीची असो टेनिस असो फुटबाॅल असो की क्रिकेट  तसेच कोणत्याही कामाची एक सीमारेषा असते त्या सीमारेषेत झाले तर ठिक नाहीतर अनर्थ होतो .काही माणसांना भयंकर आजार असतो व डाॅक्टर सांगतात की याची आयुष्यरेषा काही महिण्यांची आहे व आपणही हळहळ व्यक्त करतो की अरेरे याचे आयुष्य आता संपणार पण निरोगी धडधाकट माणसालाही एक सीमारेषा असते की साधारणता 100 वर्षाचे जास्तीत जास्त आयुष्य नियतीने आपल्याला दिलेले असते मग आपले वय आजचे किती आहे ते बघायचे व उरले किती ते मोजायचे व आपली सीमारेषा किती दूर आहे की जवळ याचा अंदाज  येतो .ती सीमारेषा कोणत्या डाॅक्टरने सांगायची गरज नाही कारण त्या डाॅक्टरचीही सीमारेषा ठरलेली आहे . सीमारेषा कुणाची 100 वर्ष अंतरावर आहे तर कुणाची लवकर आहे . रोज आपण सीमारेषेच्या जवळ जात असतो पण माणूस तो विचार न करता दुसर्‍याला फसवण्यात व आपला स्वार्थ साध्य करण्यात गुंतलेला असतो  व त्यातच आनंद शोधतो आहे. काहीजण स्वत:च सीमारेषेला लवकर जवळ करतात व स्वत:ला संपवतात पण काही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतात कोणतेही व्यसन न करता .जर का सीमारेषेचा गांभिर्याने विचार केला तर माणूस नक्कीच भानावर येईल मग शिल्लक राहिलेल्या आयुष्यात जास्तीत जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न करील. व्यसन सोडतांना कष्ट पडणार नाही तसेच तो प्रत्येकाशी प्रेमाने वागायला लागेल .दुसर्‍याच्या जास्तीत जास्त उपयोगी पडेल अनियतीने पैसा कमवणार नाही व उरलेल्या आयुष्यात जास्तीत जास्त चांगले कर्म  करेल तोंडातून वाईट शब्द निघणार नाहीत व आलेल्या संकटांवर मात करेल कारण त्याचे लक्ष सीमारेषेकडे असेल त्यामुळे कितीही मोठे संकट त्याला छोटे वाटायला लागेल.अहंकार अभिमान गर्व लोभ राग एका क्षणात गळून पडेल व मेणासारखा त्याचा स्वभाव मऊ होईल पण हे ज्याला समजेल त्याला .नाहीतर सीमारेषा  माहीत असूनही काहींच्या डोळ्यावरची झापड तशीच असते व आपल्याच तोर्‍यात वागत असतात .जो जागृत असेल तोच ह्या सीमारेषेकडून धडा घेईल व आपल्या वागण्यात बदल करेल .शंभर वर्ष आधीचा विचार केला तर पृथ्वीवरील आज दिसतात ते माणसे कुणीच नव्हते व शंभर वर्षानंतर आज जे दिसतात ते एकपण राहणार नाही सर्व सीमारेषेच्या पलीकडे गेलेले असतील व नवीन लोक सीमारेषेच्या आत येतील .बघा विचार करा व पटतं का?
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...