असणे ते नसणे
जे दिसत असते
ते खर्या अर्थाने नसते
दिसते ते असते आभास
तेच माणसाला खरे वाटते
जे असते खरे
ते सगळ्यांना नाही दिसत
खोट्या गोष्टी खर्या समजुन
रममाण होताना दिसतात
जे आज डोळ्यांना दिसते
ते काही दिवसांनी नसते
जे होते तो भास होता का
असे प्रश्न पडायला सुरवात होते
खरे नेमके असते काय
हेच नाही समजले
खर्याच्या भ्रमात माणसे
गोंधळून मात्र गेले
मी आणि माझे
माणूस मानत राहिला सत्य
ते आहे मात्र वेगळे
संत सांगत राहीले सत्य
खोट्या गोष्टीच्या चक्रात
माणूस विसरला सत्य
मी व माझी माणसे
यांच्या सुख दु:खात रमतो नित्य
माणूस होतो दिसेनासा
संसार राहतो जागेवर
काही क्षणांपुरताच होता माणूस
मन मानायला नसते हे तयार
मृत्यूनंतर कुठे जातो
धर्म सांगतात वेगवेगळे
ठामपणे कुणालाच नाही माहीत
तर्क लावतात आगळेवेगळे
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment