जग आहे एक रंगमंच
जगात कुणी आहेत श्रीमंत
तर कुणी आहेत गरीब
कुणी आहेत अपंग
तर कुणात नाही कमीची बाब
कुणी आहेत उदार
तर कुणी आहेत स्वार्थी
कुणी आहेत मतलबी
तर कुणी आहेत निस्वार्थी
कुणी आहेत गोरे
तर कुणी आहेत काळे
कुणी आहेत सडपातळ
तर कुणाला उठवावं लागते बळेबळे
कुणी आहेत गुंड
तर कुणी आहेत सज्जन
कुणी आहेत चोर
तर कुणी आहेत दुर्जन
कुणी आहेत उंच
तर कुणी आहेत बुटके
कुणी जगतात आरामात
तर कुणाला बसतात चटके
कुणी जगतो स्वत:साठी
सर्व नियम धाब्यावर ठेवून
कुणी जगतो दुसर्यासाठी
तन मन धन अर्पूण
कुणी आहेत नोकरी करणारे
तर कुणी आहेत बेरोजगार
कुणी करतात व्यवसाय
तर कुणात भरला आळस फार
जग आहे एक रंगमंच
आपल्या भूमिका वठविण्यासाठी
त्या फक्त भूमिका आहेत
हे विसरु नये आपल्यासाठी
जन्म आणि मृत्यू आहेत
सुरवात आणि शेवट रंगमंचाची
आपली भूमिका टिपण्यासाठी
तयारी आहे नियतीची
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment