Skip to main content

सावधानता

सावधानता
जीवनात सावधानता घेणे फार गरजेचे असते ते सुद्धा आपल्याकडे सर्वकाही असतांना .कशाचीच कमतरता जेव्हा नसते .जे पाहिजे ते दुसर्‍या क्षणाला आपल्यापुढे हजर होते म्हणजेच घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते .सुख हे नदीसारखे वाहत असते .घरात आनंदी आनंद असतो तेव्हा माणूस बेसावध होतो .डोळ्यांवर बेसावधची पट्टी येते व ती केव्हा येते ते काहीच कळत नाही म्हणून तर काही श्रीमंताची मुले नशेमध्ये अडकतात .नशेच्या आहारी जातात व तेथेच सर्व असूनही जीवन बरबाद होते .बर्‍याच वेळा पार्टीसाठी गाडी घेऊन जातात .दारु पिऊन गाडी भरघाव चालवतात त्यात स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात टाकतात .वाईट संगतीच्या नादी लागून विविध व्यसने जडतात व नको ते आजार किंवा कोर्ट कचेर्‍या यातच जीवनाचे महत्वाचे वर्ष निघून जातात .गरीबी असते तेव्हा पैसे नसल्याने माणूस सावधच असतो पण पैसा आल्याने माणूस बेसावध होतो व नको ते झंझट पाठीमागे लागते व एकामुळे सर्व कुटुंबातील सदस्यांना मनस्ताप होतो  म्हणून खिशात पैसे खुळखुळ्यावर जास्तच सावधपणा असणे गरजेचे आहे  कारण खिशात पैसा असला की बेसावधपणे माणूस नको तेथे त्याचा उपयोग करतो व संकट ओढवून घेतो म्हणून पैसा आल्यावर जास्तच सावध असणे गरजेचे आहे तसेच मनाला मुरड घालणे महत्वाचे आहे.होते नशिबात ते घडणार असे बोलून माणूस मोकळा होतो पण समोर विस्तव दिसत आहे व त्यात हात घातल्यावर पोळणारच ना मग हात पोळवणे हे नशिबातच होते असे म्हणणे चुकीचे आहे .सावधानता मुळे बरेच संकटे आपल्याला दूर करता येतात.शरीरात ताकद असेल तर ती दूसर्‍याला त्रास देण्यासाठी नाही किंवा लोकांना धमकविण्यासाठी नाही तर गरजू लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आहे ही सावधानता लक्षात ठेवायला हवी व सर्व सुखसुविधा असूनही जे सावधपणे वागतात    डोकं शांत ठेवून ते जीवनात यशस्वी होऊन शांत जीवन जगतात .उगीचच कोणते लचांड पाठीमागे लावून घेत नाही. अनेक प्रसिद्ध लोक मग ते अध्यात्मिक मार्गातील असो चित्रपट क्षेत्रातील असो राजकारणातील असो क्रिडा क्षेत्रातील असो शिक्षण क्षेत्रातील असो  वैद्यकी क्षेत्रातले असो नौकरी करणारे असो व्यवसाय करणारे असो काहीच न करणारे असो ज्या ज्यावेळी बेसावध राहिले त्या त्यावेळी त्यांची प्रसिद्धीची खूर्ची डगमगली व त्यांच्या हातून अशा काही गोष्टी घडल्या की त्या गोष्टींमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर वरुन थेट रसातळाला गेलेत. देहाच्या बाबतीतही माणूस बेसावध असतो .जोपर्यंत देह चांगला असतो तेव्हा माणूस बेसावध असतो .एकदा त्याच्यात बिघाड निर्माण झाला की मग सावध होतो  मग ब्लड प्रेशर ,वजन वाढणे अशा गोष्टी सुरु होतात मग त्यानंतर आपण सावध होतो.देह आज आहे उद्या नाही म्हणून तो आहे तेव्हा सावधपणे राहून चांगली कामे करावीत .सावध व्हरे मूढा देह थोडा पाण्याचा बुडबूडा.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...