Skip to main content

व्यसन

व्यसन
व्यसन हे तीन प्रकारचे लोक करतात. पहिला प्रकार संसारातील अनेक संकटांनी त्याचे मन सैरभैर झाले असेल .बायको सोडून गेली असेल किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा व्यवहारात तोटा झाला असेल किंवा नोकरी गेली असेल किंवा हातून चुकीची गोष्ट झाली असेल .भाऊबंदानी छळले असेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा गरीबी पिच्छा सोडत नसेल किंवा लग्न होत नाही किंवा अपमान सहन करण्याची ताकद नसेल असे नाना प्रकारचे कारणे असतात व ते विसरण्यासाठी लोक व्यसन करतात .दुसर्‍या प्रकारचे लोक म्हणजे अतिशय श्रीमंत ,कुठे पैसा ठेवावा हे त्यांना कळत नाही म्हणून त्या पैशाचा उपयोग इकडे पार्टी कर तिकडे पार्टी कर मग अशा पार्टींमध्ये व्यसन लागते त्यामुळे अनेक श्रीमंत घराण्यातील मुले हे पैसे भरपूर असल्यामुळे वाया जातात व त्यामुळे जगण्याचे तारतम्य विसरतात .पैशाला पायाखाली तुडवतात मग हाच पैसा एकदिवस त्यांना पायाखाली ठेचतो मग ते भानावर येतात .तिसरा प्रकार म्हणजे सामान्य माणूस .वाईट मित्रांच्या संगतीला लागतात व टेस्ट म्हणून घेण्याचा मित्र आग्रह करतात व त्या टेस्टची सवय होऊन जाते मग व्यसन लागते व त्या व्यसनापायी आपलेच नाही तर संपूर्ण कुटूंबाचे जीवन उध्वस्त करतात.मुलांना नितीनियमाचे धडे देणारे शिक्षकही यात मागे नाहीत .बर्‍याच शिक्षकांनाही तंबाखूचे ,दारूचे ,गुटखा खाण्याचे व्यसन लागलेले आपण पाहिलेले आहे .व्यसन लागते तेव्हा आपण शाळेत व्यसनामुळे किती नुकसान होते हे सर्व विसरुन जातात.ज्या व्यसनाने आपले स्वत:चे व इतरांचे नुकसान होणार नाही  व कोणत्याही प्रकारे हानी पोहचणार हे बघावे .व्यसनाधिन माणूस विवेकबुद्धी गमावून बसतो म्हणून ब्रह्मदेव जरी आला तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. बर्‍याच वेळा पालकांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नसते पण मुलांना लागते  काहीवेळा मुलांना पालकांना सांगावे लागते की व्यसन सोडा म्हणून .काहीही झाले तरी व्यसन वाईटच.काही म्हणतात आम्ही व्यसन नाही केले तर सरकारकडे कर कसा जमा होणार.असा विचार करुन  स्वत:च्या संसाराची होळी करायला नको .प्रत्येक गावात, शहरात व्यसनामुळे अनेक तरुण मुले जग सोडून गेलेत व पालकांना  व बायको पोरांना दु:खात लोटून गेलेत.
प्रा. दगा देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...