धनाची पूजा
धनतेरच्या दिवशी धनाची पूजा करतात पण जे धन दुसर्याला फसवून कमविले असेल तर ती पूजा व्यर्थ ठरते .जे धन अनितीने कमविले असेल तर त्या पूजेला अर्थ नसतो .घामाच्या पैशाने कमविलेले धन ,नितीमत्ताने मिळविलेले धन येथे अपेक्षित असते.खरे धन तर विचाररुपी धन असते .ज्या माणसाजवळ चांगल्या विचारांचे धन असते तसेच सकारात्मक विचाररुपी धन असते ,ज्या विचारांमुळे दुसर्याला जगण्याला योग्य दिशा मिळेल असे विचाररुपी धन ज्याच्याजवळ असते त्या धनाची पूजा केली पाहिजे व त्या धनाची कुणीच चोरी करु शकत नाही तसेच धनासारखे अमूल्य माणसे जेव्हा आपल्या विचारांमुळे जवळ येतात अशी माणसे जपणे म्हणजेच खर्या धनाची पूजा करणे होय .ज्यादिवशी धनासारखे माणसे आपल्यामुळे दूर गेलेत तर पूजा विस्कटित झाली असे समजा म्हणून आपल्या जीवनात नेमके धन कोणते याचा विचार करुन त्याची काळजी घेणे त्याला योग्य सन्मान देणे हे एकाच दिवशी नाही तर नेहमी जमले पाहिजे.धन नितीने कमविणे व त्याचा योग्प वापर करणे हे धनाचा सन्मान व त्याची पूजा करणे होय .काही माणसे धन कमवितात ते बॅकेत ठेवण्यासाठी तसेच चांगले विचार दुसर्याला न देता फक्त स्वत:साठी वापर करतात व खास करुन जर आपण विसरुन गेलो असेल खरे धन तर आजच्या दिवशी त्याचे स्मरण करुन परत त्याचे जतन व वापर करायला सुरवात करायला हवी.बघा पटतं का?
देवरे सर
Comments
Post a Comment