पैसा
पैसा हा देव नाही
देवाहून त्याचे महत्व कमी नाही
ज्याच्याजवळ तो कमी
त्याला जगात किंमत नाही
पैशासाठी लोक बोलतात
खूप खूप गोड
एकदा दुसर्याकडून मिळाला
मग दाखवत नाही कधी तोंड
बरेच नाते पैशांमुळे बिघडून
कायमचे तुटून जातात
पैसा ठरतो नात्यापेक्षा श्रेष्ठ
करतो तो नात्यावरच आघात
नात्याची किंमत करतात
लोक फक्त पैशाने
पैसाच ठरवत असतो
किती संबंध आहेत प्रेमाने
काही कमवतात खूप पैसा
खर्च करण्याची नसते इच्छा
अजून तो कसा जमा होईल
याची ठेवतात अपेक्षा
पै पै जमा करून
योग्य वेळी खर्चावा
ज्याला अडचणीला दिला
त्याने वेळेत परत करावा
पैशाने तोडले कायमचेच
रक्त नात्यातले संबंध
पैसा हा नातेही जोडतो
घट्ट करतो भावनिक बंध
पैशाने येऊ नये
माणसात कधी गर्व
वेळ कधी कशी येईल
तेव्हा गमावून बसणार सर्व
पैसा आहे लक्ष्मी
योग्य मार्गाने तो कमवावा
त्याचा करावा मानसन्मान
योग्य ठिकाणी जपून वापरावा
पैसा नसला तरी
कर्तृत्वाने झाले काही थोर
पैशांमुळे जाऊ नये
आपली माणसे दूर
गोड गोड बोलणारे माणसे
दुसर्यांना नेहमी फसवतात
त्यांचा असतो हाच विचार
समोरच्याचा पैसा कसा येईल आपल्या खिशात
भ्रष्टाचाराच्या पैशापेक्षा
घामाचा पैसा असतो श्रेष्ठ
वाममार्गाने कमविलेला पैसा
एक दिवशी करतो आपल्याला कनिष्ठ
प्रा. देवरे सर
Comments
Post a Comment