भेट
आपल्या प्रिय माणसांची भेट
घ्यायला नेहमीच आवडते आपल्याला
नवीन उर्जा मिळते भेटीतून
उत्साह वाटतो जगायला
निस्वार्थ भेटीने माणूस
नाचतो आनंदाने
तो स्वत:ला विसरतो
आपल्या माणसाच्या प्रेमाने
काही वेळा होते जीवनात
अनपेक्षित असलेली भेट
राहते नेहमी लक्षात
कोणतेही नसलेली अट
बर्याच भेटी होतात
काहीतरी ठेऊन अपेक्षा
टेंशन येते माणसाला
अशी भेट होऊ नये ही इच्छा
काहींची भेट असते
कधीच न विसरणारी
ती भेट असते
नेहमी आनंद देणारी
काहीं जणांची भेट ठरते
कामाच्या धावपळीची
कल्पना केलेली नसते
ही भेट असेल शेवटची
स्बत:चीच स्वत:शी भेट होणे
हे असते दुर्लभ
ते जमते साधूसंतांना
म्हणून होत नाही त्यांना कोणता लोभ
काहींची भेट न होणे
हे असते चांगले
उगीचच होतो डोक्याला ताप
बरे असते ते न दिसलेले
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment