आत्मविश्वास बडी चीज होती है बाबू
माणसाला कोणतेही काम यशस्वीपणे करण्यासाठी आत्मविश्वास असावा लागतो .हा आत्मविश्वास का डळमळतो त्याचे प्रथम कारण म्हणजे शरीर.जोपर्यंत शरीर तंदूरुस्त आहे तोपर्यंत लाथ मारील तेथे पाणी काढील असा आत्मविश्वास असतो पण जेव्हा शरीराच्या तक्रारी चालू होतात उदा. एखाद्याला कॅन्सर झाला ,अपघाताने शरीराचे अवयव निकामी झालेत पॅरालेसीस झाला, हार्टअॅटेक येऊन गेला डोळ्यांचे आजार किडनीचे आजार मेंदूचे आजार असे लवकर बरे न होणारे आजार जेव्हा जडतात तेव्हा भरपूर आत्मविश्वास असणार्या माणसांचा आत्मविश्वास संपतो .लाथ मारील पाणी काढणार म्हणणारे लोक दैनंदिन स्वत:चे कामही करु शकत नाही .पूर्ण आत्मविश्वास गमावून बसतात .त्यातच काही मार्ग काढतात व पुन्हा उभे राहतात पण ते प्रमाण क्वचितच दिसते.दुसरे कारण म्हणजे ज्या माणसांवर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच माणसांनी धोका दिला तर माणूस आत्मविश्वास गमावून बसतो त्याचप्रमाणे ज्या माणसांवर आपण प्रेम करतो ,ती व्यक्ती म्हणजे आपले जीवन ,जे जगतो त्या व्यक्तीसाठी व अशी व्यक्ती जेव्हा जग सोडून जाते तेव्हा कुणासाठी जगावे,कुणाकडे पाहून जगावे या विचारांमुळे माणूस आत्मविश्वास गमावून बसतो .काहीजण विशिष्ट काळ गेल्यावर त्यातून बाहेर पडतात पण काहींना ते शक्य नसते.एक कारण म्हणजे अपयश .परीक्षेत आलेले अपयश तसेच धंद्यात आलेले अपयश यामुळे माणूस आत्मविश्वास गमावून बसतो.काहीजण जीवनात चूका करुन बसतात व त्या चुकांमुळे त्यांना जीवनात भयंकर संकटांचा सामना करावा लागतो त्या चुकांच्या विचारांनीच स्वत:च्या नजरेतून माणूस उतरतो व आत्मविश्वास गमावून बसतो .गरीबी हे मोठे कारण आहे आत्मविश्वास गमावण्याचे .शिक्षण ,लग्न, व्यवसाय यासाठी दुसर्यापुढे हात पसरावा लागतो वेळोवेळी व त्यावेळी आत्मविश्वास डळमळतो .एक अजून कारण म्हणजे भीती .कोणत्याही गोष्टीची भीती मनात घर करुन बसली की ती गोष्ट आठवताच आत्मविश्वास डळमळू लागतो म्हणून असे कोणतेही चुकीचे काम करु नये की जेणेकरुन आत्मविश्वास गमावायची वेळ येईल .प्रत्येक गोष्टीपासून पळण्यापेक्षा त्याला धीराने तोंड दिले की आत्मविश्वास वाढू लागतो .काही गोष्टी आपण लपवून ठेवतो व त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो .जे झाले ते आपल्या माणसांकडे बोलण्यामुळे मन मोकळे होते व त्यामुळे मनातील शंका कुशंका भीती दडपण निघून जाते व आत्मविश्वास परत येतो असे अनेक कारणे आहेत आत्मविश्वास गमावण्याचे पण काहीजण सावरतात पण काही मात्र कधीच सावरत नाहीत .
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment