वाट पाहणे
जीवनात वाट बघितल्याशिवाय काहीही मिळत नाही .जन्माला येण्यासाठी नऊ महिने वाट बघावी लागते .मग बाळाला बसण्यासाठी उभे राहण्यासाठी रांगण्यासाठी धावण्यासाठीवाट बघावी लागते शाळेत जाण्यासाठी वाट पहावी लागते .परिक्षा येण्यासाठी वाट पहावी लागते .निकालासाठी वाट पाहावी लागते .नोकरीसाठी ,लग्नासाठी वाट पहावी लागते . वाट जर नाही बघितली तर प्रचंड नुकसान ठरलेले असते .काहीवेळा वाट पाहूनही पदरी काहीच पडत नाही. काहीजण संपूर्ण जीवन वाट पाहण्यातच घालवतात. वाट पाहण्यालाही एक limit असते वकुणाची किती वेळ वाट पहावीहे समजले पाहिजे नाहीतर जीवन वाट पाहण्यातच जाईल .काही गोष्टींची वाट पाहण्याची गरज नसते तसेच काही गोष्टी वाट न बघता लगेच कराव्यात म्हणजे काही गोष्टींची वाट पाहिली तर आपली वाट लागलीच समजा.वाट पाहतांना त्यातून काहीतरी निष्कर्ष निघेल त्याच गोष्टीची वाट पाहावी.काहीजण वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेले असतात व ते जाण्याची काही वाट बघतात.कुणाच्या जाण्याची जे वाट बघतात ते अत्यंत वाईट असते.आपला जवळ जवळ 25%जीवनाचा वेळ वाट पाहण्यातच जातो .50% वेळ झोपण्यात जातो.25%वेळ टाइमपास करण्यात जातो व जे साधायचे आहे त्यासाठी असतो वेळ 25%.काहींचा बराच वेळ आजारापणात भानगडीत जातो मग 25% ही उरत नाही त्यांना जीवनात काही तरी प्रगती करण्यासाठी म्हणून वेळेची बचत करावी व ती सार्थकी लावावी .
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment