विश्वास
ठेवावा विश्वास आईबाबांवर
कोणतीही शंका न घेता
होईल नक्कीच कल्याण
कोणताही अडथळा न येता
विश्वास ठेवावा गुरुजनांनवर
त्यांच्या पायापाशी बसून
जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल
त्यांच्याकडे असलेले ज्ञान
विश्वास ठेवावा सत्यावर
त्यासाठी करु नये त्रागा
खोटे पडते एकदिवशी उघडे
तोंड दाखवायला नसते जागा
विश्वास ठेवावा आपल्या आदर्शांवर
त्यांचे गुण येतील अंगी
शांत मन कायम ठेवून
गुणांचा डांगोरा पिटू नये जगी
विश्वास ठेवावा प्रामाणिकपणावर
करावे नेमून दिलेले काम
करावी निस्वार्थ मदत सगळ्यांना
कोणतेही न घेता जादा दाम
विश्वास ठेवावा सकारात्मक विचारांवर
न होणारे होते यशस्वी काम
नकारात्मक विचारांचा करावा त्याग
हवा मनाचा निश्चय त्यासाठी ठाम
विश्वास ठेवावा आपल्या दैवतेवर
सर्व प्रयत्न पार पाडून
सफलता येईल मागे मागे
करायला आपले कल्याण
विश्वास ठेवावा स्वत:वर
लाथ मारीन तेथे पाणी काढीन
अतिआत्मविश्वास मात्र नसतो चांगला
सोपे काम जाते सर्व बिघडून
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment