वास्तव
नेहमीचा येतो पावसाळा
हिवाळा आणि उन्हाळा
महापूर , दुष्काळ आणि महागाई
याने बसतात सगळ्यांना झळा
किती आलेत अन् गेलेत
याची कोणतीच गणती नाही
जगरहाटी अशीच राहणार चालू
यात कोणताही बदल होणे नाही
कितीही असेल माणूस श्रीमंत
त्याला एक दिवशी जावेच लागणार
चिंता नसावी कुणाला
त्याची जागा कुणीतरी घेणार
जग आहे एक रंगभूमी
आपण आहोत एक कलाकार
चांगली भूमिका साकारण्यासाठी
बघू नये कोणता आपण वार
माणूस आहे काही दिवसांसाठी
पृथ्वीवर आलेला पाहूणा
स्वत:ला मालक समजून
म्हणू नये मीच आहे फक्त शहाणा
वेळ वाया घालवू नये
कोणत्याही वादविवादात
आयुष्य आहे मोजके
याचे भान असावे ध्यानात
आजचे काम उद्यावर नको
उद्या येईलच याची नाही शाश्वती
आळस झटकावा त्यासाठी
उजळेल तुमची कांती
नको कोणत्या भूतकाळातील
वाईट गोष्टींना उजाळा
भविष्यांची नको तेवढी चिंता
वर्तमान करावा आपला भला
कुणी नसतो छोटा
नसतो कुणी मोठा
सगळेच आहेत जाणारे
कशाला करावा जास्त आटापिटा
चेहरा ठेवावा नेहमी हसरा
दृष्टिकोन त्यासाठी बदला
मालकाचा चालू आहे कॅमेरा
याचे स्मरण असू द्यावे आपल्याला
वस्तू व माणसांमध्ये
जास्त गुंतू नये मनी
झाला त्यांच्यात बिघाड
त्रास होतो खूप अंत:करणी
आपल्याला उचकवणारे आहेत
आपल्या नेहमी अवतीभवती
त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन
मनी ठेवावी कायम शांती
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment